Headlines

कन्नड शहरावर पाणीटंचाईचे सावट; अंबाडी प्रकल्पात 16 टक्केच साठा:6453 नळजोडण्यांचे सर्वेक्षण, अनधिकृत नळांवर होणार कारवाई‎



शहराची तहान भागविणाऱ्या अंधानेर येथील अंबाडी मध्यम प्रकल्पात केवळ १६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. ग्रॅव्हिटीने (गुरुत्वाकर्षणाने) पाणीपुरवठा करणे केवळ महिनाभरच शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिष

.

कन्नडची लोकसंख्या ५५ हजारांच्या पार गेली आहे. पिशोर नाका, चंद्रलोकनगरी, नर्सिंगपूर, शरद पवार कॉलनी आणि म्हाडा यांसारख्या नवीन वसाहतींच्या हद्दवाढीमुळे पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येत आहे. सध्या शहराला ६ व्या ते ७ व्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. अंबाडी धरणातून कमी दाबाने पाणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी तातडीने पाहणी केली. धरणातील तीन चेंबरमध्ये दगड, शेवाळ, गाळ साचल्याने पाणीप्रवाह रोखला गेला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून या चेंबरची स्वच्छता केली. एकूण लोकसंख्या : ५५,०००+ नोंदणीकृत मालमत्ता : ११,४९० अधिकृत नळजोडण्या : ६,४५३ पाणीपुरवठा कालावधी: दर ६ ते ७ दिवसांनी एकदा. वर्तमान जलसाठा: १६ टक्के (अंबाडी प्रकल्प) प्रक्रिया: ग्रॅव्हिटीने पाणी येते. त्यानंतर तुरटी व ब्लिचिंगद्वारे शुद्धीकरण. पाणीपुरवठा जुन्या जलवाहिन्यांवर अवलंबून आहे. या वाहिन्यांची क्षमता संपली आहे. पाण्याचा दाब वाढला की त्या फुटण्याचे प्रमाण वाढते. गेल्या आठवड्यात तीन वेळा जलवाहिनी फुटली. दुरुस्तीत वेळ वाया गेला. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. अभियंता राहुल करडे, निरीक्षक रमेश थोरात, शिवा निकम, सुनील भाले, विकास सावंत, विलास काजेकर, शुभम मगर, विकास रोडगे, शेख समीर, बंटी कांतीकर, रोहन मगर, निलेश पाटील, विजय साळवे यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार होता.

^कन्नड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी २५ वर्षांपूर्वीची आहे. तिची क्षमता आता संपली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन व ठोस उपाययोजनांची गरज आहे. नगराध्यक्षांशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे नियोजन आहे. – रवींद्र लांडे, मुख्याधिकारी

अशी आहे पाणीस्थिती

२५ वर्षांपूर्वीची वाहिनी ठरतेय मोठा अडथळा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *