Headlines

पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ देऊ नका:मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश; दिंडोरी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा‎




तालुक्यातील मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांना सतर्क राहून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री झिरवाळ यांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा आढावा घेत संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खत उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधसाठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्याचे आदेश िदले. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी धोकादायक वीजखांब व झाडांच्या फांद्या छाटण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच रस्ते दुरुस्ती, पुलांची सुरक्षितता, धरणांमधील पाणीसाठ्याचे नियोजन आणि शहरातील नालेसफाई व पाणी निचरा व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तालुक्यातील जनतेला पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी ग्वाही प्रांत अप्पासाहेब शिंदे यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापनावर विशेष लक्ष : झिरवाळ पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने २४ तास सतर्क राहावे. नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवून नागरिकांना वेळेत मदत पोहोचेल, याची खात्री करण्याचे आवाहन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *