Headlines

सोलापुरात वकिलाच्या कारमधून 1.90 कोटी किमतीचे 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’ जप्त:दाेन आरोपी फरार, दोघांना अटक करून पोलिस कोठडी




सोलापूर शहरातील एका वकिलाच्या कारमधून 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज (एमडी) जप्त करण्यात आली. ज्याची किंमत 1 कोटी 90 लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीसह चौघांवर गुन्हा दाखल केला. पैकी दोघांना अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. इतर दोघे फरार आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. तिचा या प्रकरणाशी काय संबंध याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असून, ती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास पेट्रोलिंग करताना एक कार संशयास्पद दिसली. त्याला पोलिसांनी वेढा घालून चालकास ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्या कारमध्ये एमडी असल्याचे दिसले. 15 दिवसांपूर्वी दीड लाख किमतीचे 46.93 ग्रॅम एमडी पकडले होते. त्या प्रकरणाचा याच्याशी काही संबंध आहे का? याचा तपास सुरू असल्याची माहिती प्रभारी पोलिस आयुक्त हसन गौहर यांनी दिली. चालक रिजवान शब्बीर खान (वय 26, रा. अंबिका नगर), साहिल सिकंदर पीरजादे (वय 25, रा. अल्तमश अपार्टमेंट) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. अफजल मुर्शद या मुख्य आरोपीसह एक फरार आहे. शहर गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते. व्हीआयपी रोड परिसरात एक पांढऱ्या रंगाची कार (एमएच 13 ईएस 1411) संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती पोलिस शिपाई भारत पाटील यांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकाने त्या कारला वेढा घातला. चालक रिजवानला ताब्यात घेतले. ​कारची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटजवळील ड्रॉव्हरमध्ये 950 ग्रॅम वजनाचा पांढरा स्फटिक पदार्थ सापडला. फॉरेन्सिक टीमकडून त्याची तपासणी करून एमडी ड्रग्ज असल्याची खातरजमा करण्यात आली. याबाबत रिजवान म्हणाला, ‘साहिल पीरजादे आणि एका अनोळखी व्यक्तीकडून हे पदार्थ घेतले. ते अफजल मुर्शद याच्यामार्फत कारमध्ये ठेवल्याचे तपासात उघड झाले. एमडीसह 10 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली झाली. संशयित साहिल पीरजादेच्या पत्नीलाही ताब्यात घेतले या प्रकरणात वापरलेली कार एका वकिलाची आहे. फरार असलेल्या अफजल मुर्शद याच्या भावाची ती कार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. एमडी प्रकरणात सोलापुरातील वकिलाची कार मिळून आल्याने चर्चेला उधाण आले आहे. संशयित साहिल पीरजादे याचे एक वर्षापूर्वी लग्न झाले. त्याच्या सोबत पत्नी असून तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. ती मूळ मुंबईची असून साहिलबरोबर लग्न झाल्यानंतर सोलापुरात स्थायिक झाली. तिचा या प्रकरणाशी संबंध आहे का? याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कारही जप्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *