Headlines

माउलींचा मुक्काम यंदाही पुण्यातील भवानीपेठेतच:श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर




श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने वर्ष २०२६ च्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, पुण्यातील मुक्कामाबाबत असलेला पेच अखेर सुटला आहे. भाविकांची वाढती संख्या आणि जागेची टंचाई यामुळे मुक्काम बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर यंदाही पुण्याचा मुक्काम भवानीपेठ येथील श्री पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुणे मुक्कामाचा वाद आणि तोडगा गेल्या काही वर्षांपासून भवानी पेठेतील जागा अपुरी पडत असल्याने मुक्काम रेसकोर्स किंवा सणस ग्राऊंडवर हलवण्याची मागणी होत होती. मात्र, पुणे महानगरपालिकेने या परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करण्याचे आणि मंदिरालगतच्या ३ खासगी मिळकती ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी महापालिकेने १० कोटी रुपयांची तरतूद केली असून ३१ मे २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील प्रमाणे परतीचा प्रवास २९ जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मणी भेट , पादुकांजवळ विसावा व सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे. परतीचा प्रवास २९ जुलै वाखरी, ३० जुलै वेळापूर, ३१ जुलै नातेपुते, १ ऑगस्ट फलटण, २ ऑगस्ट पाडेगाव, ३ ऑगस्ट (श्रींचे नीरा स्नान)वाल्हे, ४ ऑगस्ट सासवड, ५ ऑगस्ट हडपसर, ६ ऑगस्ट (भवानी पेठ)पुणे, आळंदी,७ ऑगस्ट पुणे, ८ ऑगस्ट रोजी पुण्याहून आळंदी कडे पालखी सोहळा येणार आहे. पालखी सोहळ्याचे टप्पे प्रस्थान: बुधवार, ८ जुलै २०२६ (दुपारी ४ वाजता, आळंदी). पुणे मुक्काम: ९ आणि १० जुलै २०२६ (दोन दिवस). सासवड मुक्काम: ११ आणि १२ जुलै २०२६. जेजुरी मुक्काम: १३ जुलै २०२६. नीरा स्नान: १५ जुलै २०२६. पहिले उभे रिंगण: १७ जुलै २०२६ (चांदोबाचा लिंब). पंढरपूर आगमन: २४ जुलै २०२६ (आषाढ शुद्ध दशमी). मुख्य आषाढी एकादशी: शनिवार, २५ जुलै २०२६.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *