Headlines

Ajit Pawar Plane Accident CCTV Footage Denied By Mumbai Police & BCAS


राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला साडेनऊ महिने उलटून गेले, तरी या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात होता की घातपात, याबाबत उपस्थित होणारे प्रश्न कायम असतानाच आता या प्रकरणातील CCTV फुटेजचा मुद्द

.

विमानतळावरील सकाळी 6 ते 9 वाजताचे फुटेज मागितले

अॅड. नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मुंबई विमानतळावरील 28 जानेवारी 2026 रोजी पहाटे 6 ते सकाळी 9 या वेळेतील CCTV फुटेज मागितले होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील हालचाली आणि त्या दिवशी घडलेल्या घटनांची माहिती मिळावी, या उद्देशाने त्यांनी हा अर्ज केला होता. मात्र, नागरी विमान सुरक्षा ब्युरोच्या (BCAS) जनमाहिती अधिकाऱ्यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या उत्तरात संबंधित फुटेज देण्यास नकार दिला.

यानंतर अर्जदाराने माहिती अधिकार कायद्याच्या कलम 19(1) अंतर्गत प्रथम अपील दाखल केले. माहिती नाकारताना नेमकी कोणती कायदेशीर तरतूद लागू होते, याचे स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचा आक्षेप अपीलमध्ये घेण्यात आला. तसेच, संपूर्ण माहिती नाकारण्याऐवजी संवेदनशील भाग वगळून उर्वरित माहिती देण्याची तरतूद असतानाही त्याचा विचार करण्यात आला नसल्याचे अर्जदाराने नमूद केले.

तपास यंत्रणांना फुटेज दिल्याची BCASची कबुली

या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, 16 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या उत्तरात BCASने संबंधित CCTV फुटेज तपास यंत्रणांना दिल्याचे स्पष्ट केले आहे. बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या AD क्रमांक 11/2026 आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 194 अंतर्गत सुरू असलेल्या तपासासाठी हे फुटेज तपास यंत्रणांसोबत सामायिक करण्यात आल्याचे ब्युरोने म्हटले आहे.

मात्र, DG BCAS यांच्या परवानगीशिवाय कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांव्यतिरिक्त अन्य कोणालाही CCTV फुटेज किंवा त्यासंबंधित माहिती देता येत नसल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. यासाठी नागरी विमान सुरक्षा ब्युरोच्या 30 जानेवारी 2023 रोजीच्या Aviation Security Order क्रमांक 02/2023 मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे.

तसेच, माहिती अधिकार कायद्याच्या कलम 8(1)(h) नुसार तपास, आरोपींचा शोध किंवा खटला चालविण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकणारी माहिती देण्यापासून सूट असल्याचे सांगण्यात आले. याच कारणावरून प्रथम अपीलमधील मागणीही मान्य करण्यात आली नाही.

देवगिरी निवासस्थान ते विमानतळापर्यंतचे फुटेजही नाकारले

दुसरीकडे, अजित पवार यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानापासून मुंबई विमानतळापर्यंतच्या प्रवासादरम्यानचे CCTV फुटेज मिळवण्यासाठीही माहिती अधिकारांतर्गत अर्ज करण्यात आला होता. हे फुटेज मुंबई पोलिसांकडे मागण्यात आले होते. मात्र, संबंधित माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

मुंबई पोलिसांच्या उत्तरात संबंधित माहिती सार्वजनिक कामकाजाशी संबंधित नसल्याचे तसेच ती उपलब्ध करून दिल्यास व्यक्तीच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो, अशी कारणे देण्यात आल्याचे अर्जदाराकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळावरील तसेच अजित पवार यांच्या निवासस्थानापासून विमानतळापर्यंतच्या प्रवासातील CCTV फुटेज मिळवण्याचा प्रयत्न अद्याप निष्फळ ठरला आहे.

रोहित पवारांचे सरकार आणि तपास यंत्रणांवर गंभीर आरोप

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सरकार आणि तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांचा मृत्यू नेमका अपघातामुळे झाला की त्यामागे घातपात होता, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची CBI चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. विमान अपघातातील तांत्रिक त्रुटी, ब्लॅक बॉक्स, विमान कंपनी आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

रोहित पवार यांनी विमानात पुरेसे इंधन असल्याचा दावा केला. तसेच ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगण्यात आले असले, तरी अमेरिकेतील संस्थेच्या आणि DGCAच्या अहवालात विमानातील काही अनियमिततांकडे लक्ष वेधण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात FIR दाखल करण्याची मागणी करूनही ती नोंदवण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘मफलर मॅन’चा फोटो दाखवत फडणवीसांच्या उपस्थितीचा उल्लेख

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्ही.के. सिंग यांचा मुलगा रोहित सिंग यांच्या लग्नातील काही फोटो आणि व्हिडिओ दाखवले. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि राघव शर्मा यांच्यासह अनेक नेते आणि कलाकार उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून गायब करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी सोशल मीडियावर यापूर्वी शेअर केलेल्या मफलरच्या फोटोबाबत स्पष्टीकरण दिले. संबंधित फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मफलर घातलेल्या अवस्थेत दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस आणि राघव शर्मा यांचा एकत्रित फोटोही त्यांनी दाखवला.

मात्र, या व्यक्तीचा अजित पवार यांच्या अपघात किंवा कथित घातपाताशी थेट संबंध असल्याचा आरोप आपण करत नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. व्ही.के. सिंग यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा समावेश असल्याचे आपले मत असल्याचे सांगत, अशा परिस्थितीत अजितदादांना न्याय मिळेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच व्ही.के. सिंग आणि रोहित सिंग यांना अटक करण्याची मागणीही केली.

VSR कंपनी आणि परदेशातील मालमत्तांबाबतही प्रश्न

रोहित पवार यांनी VSR विमान कंपनीचे मालक आणि संबंधित व्यक्तींच्या परदेशातील मालमत्तांबाबतही काही दावे केले. राहुल सिंग यांच्याकडे दुबईचा गोल्डन व्हिसा असल्याचे सांगत त्यांनी दुबईतील कंपन्या आणि विमानांच्या मालकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. तसेच हैदराबादमधील विश्वसमुद्र कंपनीशी संबंधित विमानाचा उल्लेख केला.

याशिवाय अमेरिकेत नोंदणीकृत N29VK क्रमांकाच्या विमानाचा आणि रोहित सिंग, राहुल सिंग व व्ही.के. सिंग यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केलेल्या महागड्या मोटारींचा फोटो त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. फ्लोरिडामध्ये सुमारे 18 कोटी रुपयांचे घर अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी खरेदी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. हे घर गायक कोडॅक ब्लॅक यांच्याकडून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. या मालमत्ता आणि व्यवहारांचा अपघाताशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास होण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. या सर्व दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

अपघाताच्या दिवशीच्या आर्थिक व्यवहारांवरही संशय

रोहित पवार यांनी शिवनिका ट्रस्ट आणि समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या दाव्यानुसार, 27 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत समता पतसंस्थेतून 5 कोटी 33 लाख रुपयांचे व्यवहार झाले.

1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत समता पतसंस्थेच्या व्यवहारांबाबत दरमहा मर्यादित संदेश येत असताना 27 जानेवारीला 17 आणि 28 जानेवारीला 19 संदेश आल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या अपघाताच्या आसपासच्या काळात व्यवहारांबाबत अचानक आलेल्या या संदेशांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच, अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याची माहिती देऊनही सीआयडीने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूमागील सत्य शोधण्यासाठी सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

CCTV फुटेज आणि तपासाबाबत प्रश्न कायम

एकीकडे रोहित पवार यांनी विमान अपघाताच्या तपासातील त्रुटी, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे माहिती अधिकारातून मागवण्यात आलेले CCTV फुटेज देण्यास केंद्र सरकारच्या नागरी विमान सुरक्षा ब्युरोने आणि मुंबई पोलिसांनी नकार दिला आहे. विशेष म्हणजे, विमानतळावरील फुटेज तपास यंत्रणांना दिल्याचे BCASने मान्य केले आहे.

तपासात अडथळा येऊ नये म्हणून काही माहिती गोपनीय ठेवण्याची कायदेशीर तरतूद असली, तरी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार, हा मुद्दा कायम आहे. आता या प्रकरणात रोहित पवार यांच्या CBI चौकशीच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेते आणि CCTV फुटेजबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असते, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा….

ते त्यांच्या नेत्यासाठी बोलतात, मी माझ्या काकांसाठी बोलतोय!:नेत्याने उत्तर दिल्यावर मी बोलेन; रोहित पवारांचा भाजप नेत्यांसह सत्यजीत तांबेंना सणसणीत टोला

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर भाजप नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी कालच्या सादरीकरणाच्या माध्यमातून सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्यांना प्रश्न विचारले आहेत, कार्यकर्त्यांना नाही. जे नेत्यांचे भक्त आहेत किंवा नेत्याला खूश करण्यासाठी बोलतात, त्यांच्या विधानांना मी उत्तर देत नाही. ते त्यांच्या नेत्यासाठी बोलतात आणि मी माझ्या काकांसाठी बोलतोय; जेव्हा त्यांचे मोठे नेते उत्तर देतील, तेव्हाच मी पुढे बोलेन,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. मंगळवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.