Headlines

Akola Doctor Arrested For Molesting Woman Patient In Civil Lines


अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस ‎स्टेशनच्या हद्दीत उपचाराच्या‎ बहाण्याने एका महिला रुग्णाचा‎ विनयभंग केल्याची धक्कादायक‎ घटना समोर आली आहे.‎ या प्रकरणी पीडित तरुणीच्या‎ तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ ‎कारवाई केली. आरोपी डॉक्टरला‎ गजाआड केले. या घटनेमु

.

पोलिसांच्या माहितीनुसार,‎ तक्रारदार महिला सात ते आठ‎ महिन्यांपासून संबंधित डॉक्टरकडे‎ उपचार घेत होती. 29 ऑगस्ट रोजी ‎सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ‎ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली ‎होती. यावेळी तपासणीच्या बहाण्याने,‎ तसेच चेहऱ्यावरील केसांवर उपचार ‎करण्याच्या बहाण्याने, डॉक्टरने तिला‎ वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेले. तिला ‎मिठी मारण्याचा प्रयत्न केला. चुंबन ‎घेण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर ‎औषध देण्याच्या बहाण्यानेही ‎डॉक्टरने लज्जास्पद वर्तन केल्याचे‎ तक्रारीत नमूद केले आहे. ‎कुटुंबीयांसह सिव्हिल लाइन पोलिस‎ ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी ‎गुन्हा नोंदवला आहे.‎ आरोपी डॉ. प्रवीण श्यामसुंदर ‎अग्रवाल (46, रा. म्हाडा कॉलनी,‎रामनगर, अकोला) याला ताब्यात‎ घेऊन अटक केली आहे.

‎असे आहेत नियम‎

महिला रुग्णांची तपासणी ‎

  • महिला अटेंडंट / नर्स अनिवार्य‎ आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व ‎आरोग्य विभागाच्या नियमांनुसार, ‎पुरुष डॉक्टरने महिला रुग्णाची ‎तपासणी करताना कक्षात महिला ‎परिचारिका, रुग्णासोबत आलेली ‎महिला नातेवाइक असावी.‎
  • कन्सेंट आवश्यक : कोणत्याही ‎संवेदनशील तपासणीपूर्वी महिला‎ रुग्णाची स्पष्ट परवानगी घेणे‎ आवश्यक असते.
  • ३. क्लोज डोअर‎ एक्झामिनेशन: एकट्या महिलेची‎ तपासणी नियमात नाही.‎

दुसरीकडे अकोल्यात घरावर दरोडा

अकोला शहरातील मोहता मिल रोड परिसरात सोमवारी (दि. 31)‎ सकाळी व्यावसायिकाच्या घरावर ‎‎दरोड्याची घटना घडली. ‎दरोडेखोरांनी व्यावसायिकाला बेदम ‎‎मारहाण केली. त्यांचे हातपाय ‎बांधले. त्यांना खोलीत डांबले.‎ तिजोरी फोडून सुमारे 50 लाख ‎रुपयांचे सोन्याचे दागिने व 4 ‎लाख रुपयांची रोकड, असा एकूण 54 लाखांचा ऐवज लंपास केला.‎ नया जीन परिसरातील रहिवासी‎ विजय गुप्ता हे ‘गुप्ता फ्लॉवर ऑइल‎इंडस्ट्रीज’ चालवतात. त्यांच्या‎ घराच्या तळमजल्यावरच कारखाना ‎आहे. सोमवारी सकाळी सुमारे 7‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎.15 वाजता गुप्ता नेहमीप्रमाणे ‎कामगारांना सूचना देण्यासाठी ‎खाली आले. तेवढ्यात अचानक‎ तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला.‎

पूर्वनियोजित कट‎

गुप्ता यांच्याकडे गत 4-4 वर्षांपासून‎ काम करणाऱ्या एका हमालावर‎ पोलिसांचा मुख्य संशय आहे. ‎त्याला घराची रचना, दैनंदिन‎ वेळापत्रक व हालचालींची पूर्ण ‎माहिती होती. गत काही ‎दिवसांपासून तो एका नवीन ‎मित्रासह कामावर येत होता.‎सोमवारी सकाळी तिसऱ्या‎ साथीदारासह दरोडा टाकला.‎ हे ही वृत्त वाचा

डॉ. राजेंद्र रूपनवर आत्महत्या प्रकरण:फलटण रुग्णालयात चाललंय तरी काय?; सुषमा अंधारे अन् रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

माजी मंत्र्यांच्या पीएची जीवे मारण्याची धमकी आणि रुग्णालय प्रशासनाचा मानसिक त्रास यातून आलेल्या वैफल्यातून फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी स्वतःच्या हातावर ‘सुसाईड नोट’ लिहून आयुष्य संपवले. सायन रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे. याच रुग्णालयात वर्षापूर्वी डॉ. संपदा मुंडे यांनीही आत्महत्या केली असल्याने, फलटण रुग्णालयात नेमके चाललेय तरी काय? असा संतप्त सवाल विरोधकांकडून उपस्थित होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या निलंबनाची घोषणा केली असली, तरी विरोधकांनी या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेपावर बोट ठेवत निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची जोरदार मागणी लावून धरली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.