Headlines

APG Report-2026 Cyber Scam, SIMs sent through T-shirt stitching, money disappeared from Hawala-Crypto in 20 minutes


  • Marathi News
  • National
  • APG Report 2026 Cyber Scam, SIMs Sent Through T shirt Stitching, Money Disappeared From Hawala Crypto In 20 Minutes

अजय प्रकाश | नवी दिल्ली32 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतात सायबर फसवणूक आता केवळ बनावट कॉल किंवा मेसेजपुरती मर्यादित राहिलेली नाही. संघटित गुन्हेगार सिम कार्ड व बँक खात्यांची तस्करी करण्यासाठीही नवीन मार्ग अवलंबत आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आशिया-प्रशांत गटाच्या (एपीजी) ‘सायबर स्कॅम हब्स अँड ह्युमन ट्रॅफिकिंग रिपोर्ट-२०२६’ मध्ये खुलासा झाला की, भारतीय तरुणांच्या नावावर घेतलेले सिम कार्ड व डेबिट कार्ड टी-शर्टच्या शिलाईत लपवून कुरिअरने परदेशात पाठवले जात होते.

तिथे बसलेले सायबर भामटे यांचा वापर भारतातील लोकांना डिजिटल अरेस्ट, जॉब स्कॅम व इतर ऑनलाइन फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी करतात. यामध्ये सर्वात मोठे आव्हान आता हे समोर आले आहे की, हवाला व क्रिप्टोकरन्सीच्या गुंतागुंतीच्या नेटवर्कद्वारे फसवणुकीचा पैसा अवघ्या २० मिनिटांत गायब होतो. या स्कॅम हबचे लक्ष १०० हून अधिक देश आणि अधिकार क्षेत्रातील नागरिक आहेत.

तरुणांना आयटी किंवा कस्टमर सपोर्टची नोकरी, चांगले वेतन, मोफत तिकिटाचे स्वप्न दाखवून म्यानमार, कंबोडिया, लाओसला पाठवतात. तिथे पासपोर्ट जप्त केले जातात.

भारतात बेकायदा कमाईतून सोने-मौल्यवान रत्नांची खरेदी

भारतात या बेकायदा कमाईला सुरक्षित करण्यासाठी गुन्हेगार सोने, मौल्यवान दागिने, लक्झरी गाड्या आणि मौल्यवान रत्ने खरेदी करण्यात गुंतवणूक करत आहेत. हा मार्ग पैशांचा स्त्रोत पूर्णपणे मिटवण्यासाठी आणि त्याचे वैध संपत्तीत रूपांतर करण्यासाठी वापरला जात आहे. अनेकदा रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली जाते.

क्रिप्टो एटीएमने देतायेत एजन्सींना चकवा

रिपोर्टमध्ये ‘हाय-व्हिलॉसिटी मनी लाँड्रिंग’च्या धोकादायक ट्रेंडचा खुलासा केला आहे. गुन्हेगार फसवणुकीचा पैसा मिळाल्यानंतर अवघ्या १० ते २० मिनिटांच्या आत तो अनेक खात्यांमध्ये फिरवतात. त्यामुळे पोलिसांना तो गोठवणे अशक्य होते. यासाठी एका गुंतागुंतीच्या ‘हवाला-क्रिप्टो लूप’चा वापर केला जात आहे-

सर्वात आधी पैसा ‘म्युल अकाउंट्स’मध्ये जमा होतो. ही खाती तरुणांना आमिष दाखवून उघडतात. पीडितांकडून फसवणूक केलेली रक्कम या म्युल खात्यांतून हवाला चॅनेलद्वारे दुबईला पाठवली जाते. दुबईत या कॅशला क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलून पुन्हा सिंडिकेटच्या डिजिटल वॉलेटमध्ये टाकले जाते. यानंतर ते क्रिप्टो एटीएममधून काढून घेतले जाते. हे सर्व अवघ्या २० मिनिटांत होत आहे.

असे काम करतो ‘हवाला-क्रिप्टो लूप’

छोट्या फ्लॅट्समधून ऑपरेशन: गुन्हेगार ‘स्कॅम कंपाऊंड्स’ऐवजी रहिवासी भागातील छोट्या फ्लॅट्स, हॉटेल्स किंवा व्हेकेशन रेंटल्समधून काम करत आहेत. यांचे नियंत्रण म्यानमार, कंबोडिया किंवा फिलिपिन्समध्ये असते.

पंजाब आणि राजस्थान : भरती, म्यूल खाते

रिपोर्टनुसार, भारतातील दोन राज्ये या सिंडिकेटसाठी ‘सप्लाय चेन’चे मुख्य केंद्र म्हणून उभी राहिली आहेत: पंजाब: पतियाळा, अमृतसर, बठिंडा यांसारख्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर म्युल खाती, सिम कार्डचे नेटवर्क आढळले. एका प्रकरणी व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे नावे सिम कार्ड खरेदी केले गेले. राजस्थान: डिडवाना-कुचामन जिल्ह्यातील मौलासर आणि नावा ब्लॉकमध्ये शेकडो अशी बँक खाती सापडली आहेत ज्यांचा वापर परदेशात बसलेले हँडलर्स करत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *