Headlines

अमृता फडणवीस म्हणाल्या ‎मला राजकारणात रस नाही‎:आष्टीत आयोजित महाआरोग्य शिबिराला उपस्थिती‎




राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ‎‎यांच्यावर काँग्रसेकडून करण्यात‎आलेली गुंगी गुडीया ही टिका‎‎ निषेधार्ह ‎‎असल्याचे मत ‎‎‎मुख्यमंत्री देवेंद्र ‎‎‎फडणवीस यांच्या ‎‎‎पत्नी अमृता ‎‎‎फडणवीस यांनी ‎‎‎व्यक्त केले. जे ‎‎‎दिल्ली येथील ‎‎आंदोलनाबाबत विचारलेल्या ‎प्रश्नावर त्या म्हणाल्या, की जेन झी ‎‎सकारात्मक आहे. त्यांची वाटचाल‎ योग्य दिशेने सुरु आहे. दिल्लीच्या ‎‎आंदोलनात काही अपप्रवृत्ती शिरल्या ‎‎होत्या. मला राजकारणात काही रस‎ नाही. मात्र, लोकांसाठी काम करत‎ राहणार त्यांनी सांगितले.‎ आष्टी येथे आयोजित महाआरोग्य‎ शिबिराच्या उद्घाटनासाठी बुधवारी ‎त्या आल्या होत्या. यावेळी‎ माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कणखर ‎आहेत. त्या पाठीमागे उभ्या होत्या म्हणून अजितदादा चांगले काम करु‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शकले. त्यांच्या पश्चातही ‎सुनेत्राताईंनी धिरोदात्त भूमीका घेतली‎ आहे. त्यांच्यावरील टीका निंदनीय ‎आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे न‎ शोभणारे आहे. संजय राऊत ‎यांच्याबाबत बोलण्याची गरज नाही.‎ त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा ‎गप्प राहिलेलं चांगलं. कोणत्याही ‎मुद्यावर मत मांडताना आधी अभ्यास ‎करावा, असे त्या म्हणाल्या.‎ आंदोलनाचा डेकोरम दिल्लीत पाळला नाही‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *