Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावी:पक्ष संघटन अन् जिल्हा बँक निवडणुकीसाठी दोन दिवसांचा दौरा




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील आपल्या मूळ ‘दरे’ या गावी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवसांच्या या अचानक झालेल्या दौऱ्यात ते गावी मुक्कामी असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामागील नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नसलं तरी, आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून या दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पक्षसंघटनेची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दौरा आयोजित केला आहे. दरे येथील दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान ते सातारा व परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन स्थानिक राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणार असल्याची चर्चा आहे. या दौऱ्यादरम्यान सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे समजते. दुसरीकडे, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पक्षचिन्ह हे मूळ राजकीय पक्षाचे की विधिमंडळ पक्षाचे? असा महत्त्वाचा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. या सर्व संवेदनशील राजकीय पार्श्वभूमीवर शिंदेंनी साताऱ्यातील दरे गाव गाठल्याने विविध राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना पक्षचिन्हावर आज पुन्हा सुनावणी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ऐतिहासिक सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात काल अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. आज दुपारी 2 वाजता या प्रकरणावर पुन्हा पुढील सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांचा कळीचा प्रश्न सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणातील सर्वात कळीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, राजकीय पक्षातील बहुमत नेमके कसे मोजायचे, याची व्याख्या करणे हाच यातील सर्वात ‘ग्रे एरिया’ (गुंतागुंतीचा भाग) आहे. हे बहुमत मोजण्याचे नेमके निकष काय असू शकतात? यामध्ये विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधींचा समावेश कसा करायचा? यावर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये किंवा पक्षाच्या घटनेत काही फॉर्म्युला आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *