![]()
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीची ‘कॉक्रोच कॉन्क्लेव्ह’ शहरातील अभिजित दिपके यांच्या घरी पार पडत आहे. या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सीजेपीच्या खर्चाचा मुद्दा समोर आला आहे. यात ‘दिव्य मराठी’ने केलेल्या तपासणीत सर्व काही साधारण असल्याचे समोर आले आहे. पार्टीचे भविष्य ठरवण्यासाठी असलेल्या या बैठकीसाठी पार्टीचे प्रवक्ते व अन्य पदाधिकारी बुधवारी सायंकाळी दोन वेगळ्या विमानाने शहरात आले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास व हॉटेलातील स्टे यावर अनेकांचे लक्ष लागले होते. या बैठकीसाठी प्रवक्ते आशुतोष रांका, सौरभ दास तर पदाधिकारी वैष्णवी गौर, अनिकेत भारद्वाज, रत्ना सिंह, अजिंक्य शिंदे, दीपक बनियानो, विजय मल्लागी शहरात आलेले आहेत. या सर्वांचा विमान प्रवास हा इकॉनॉमी क्लासने झाला असल्याचे समोर आले आहे. त्यांना विमानतळावरून दिपके यांच्या घरी नेण्यासाठी दिपके यांच्याकडे असलेल्या कारचाच वापर करण्यात आला होता. यात दास बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरात आले होते. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरात आले. सर्व जण दिपकेंच्या घरी जमले. रात्री दोन वाजेपर्यंत सर्व जण तिथेच होते. त्यांनी तिथेच रात्रीचे जेवण केले. त्यानंतर अहिल्यानगर रोडवरील एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. यासाठी साधारण ४ ते ५ हजार रुपये किमतीच्या ४ रूम बुक करण्यात आल्या आहेत. यात एका रूममध्ये दोघे असे शेअरिंगने वास्तव्यास आहेत. आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याच्या कुटुंबाकडून भेट हिंगोलीहून आलेल्या शीतल ढगे यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली. नीट परीक्षेत झालेल्या घोळानंतर त्यांच्या मुलाने आत्महत्या केली होती. “माझ्या मुलाने दररोज १६-१७ तास अभ्यास करून नीटची परीक्षा दिली होती. आमच्या मुलाला आणि इतर निष्पाप विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याच अपेक्षेने आम्ही येथे आलो आहोत,” असे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. आशुतोष रांका म्हणाले काही यूट्यूबर्सनी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांच्या घरात घुसले. त्यांनी चुकीची माहिती देत कुटुंबाच्या अभिव्यक्तीचे आणि गोपनीयतेचे उल्लंघन केले. बैठकीदरम्यान टेरेसवर कोल्डड्रिंकचा आनंद दुपारी बारा वाजेच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली. सर्वांच्या जेवणासाठी स्पेशल ‘महाराष्ट्रीयन थाळी’ मागवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी घरच्या टेरेसवर येऊन एकत्रितपणे कोल्डड्रिंकचा आनंद घेतला. दुपारपर्यंत शांततेने सुरू असलेली मीटिंग प्रवक्ते दास यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर काहीशी तणावात गेल्याचे सूत्रांनी सांगितले. तर सायंकाळी अभिजित यांनी घराच्या खाली येऊन समर्थकांची भेट घेतली. अभिनंदन करण्यासाठी आलेला केक कापून त्यांनी उपस्थित पोलिस बांधवांना खाऊ घातला.
Source link
कॉन्क्लेव्ह:सीजेपीचे पदाधिकारी इकॉनॉमी क्लासने आले; रूम शेअरिंग करत हॉटेलमध्ये स्टे, ‘दिव्य मराठी’ने केलेल्या तपासणीत सर्व काही साधारण