![]()
जादा आणि निश्चित मासिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बाणेर येथील एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी कंपनीची संचालिका विशाखा अविनाश राठोड हिला संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) भारतात आणण्यात आले आहे. ३ ऑगस्ट रोजी ती पुण्यात पोहोचताच महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने तिला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या विनंतीनंतर सीबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून विशाखाविरुद्ध ‘रेड नोटीस’ जारी केली होती. तिचा पती आणि मुख्य आरोपी अविनाश राठोड याला यापूर्वीच २३ जुलै २०२६ रोजी यूएईतून भारतात आणून अटक करण्यात आली आहे. अविनाश राठोड, त्याची पत्नी विशाखा आणि त्यांच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवले होते. जसजसा तपास पुढे गेला आणि अनेक फसवणूक झालेले गुंतवणूकदार समोर आले तसतशी तपासाची व्याप्ती वाढून हा आकडा ८८ कोटींवर पोहोचला. सिस्पे घोटाळ्यातील राहुल काळोखे फिजीतून अटकेत अहिल्यानगर, पुणे आणि बीड जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित सिस्पे इन्फिनिटी आणि इनफिनाइट बिकन यात आर्थिक महाघोटाळ्याप्रकरणी मोठी कायदेशीर कारवाई झाली असून शेअर बाजारात आणि वेगवेगळ्या योजनांमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून सुमारे २१ हजार गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा मुख्य मास्टरमाइंड राहुल शामराव काळोखे याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाई करून थेट फिजी देशातून अटक करण्यात आली होती. इंटरपोलच्या साहाय्याने त्याला भारतात आणण्यात आले आहे.
Source link
तब्बल 88 कोटींची फसवणूक:सीबीआय-इंटरपोलच्या मदतीने पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई, विशाखा राठोडचे यूएईतून भारतामध्ये प्रत्यार्पण