Headlines

Ashish Shelar Launches Bappa Katta Cultural Festival At Fergusson College Pune



महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव जपत, सांस्कृतिक वारसा संवर्धनाच्या उद्देशाने ‘बाप्पाचा कट्टा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाचा फर्ग्युसन महाविद्यालय येथे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कलार

.

यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, Bappp.org चे व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद अष्टेकर उपस्थित होते.

शेलार म्हणाले, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने यावर्षी गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. या महोत्सवाअंतर्गत देशात व राज्यात तालुका स्तरापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी दुबईमध्ये देखील राज्य महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाची वर्ल्ड युनोस्को कडे वाटचाल असून सुरु आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या bappa.org उपक्रमांतर्गत ‘बाप्पाचा कट्टा’ हा ९० दिवसांचा सांस्कृतिक महाउत्सवात या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबे, मित्रमंडळी आणि कलाकारांना कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडे, विविध लोककला, मराठी म्हणी, अंताक्षरी अशा पारंपरिक कलाप्रकारांसह आधुनिक कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

गणेशोत्सव धार्मिक, श्रद्धेचे अधिष्ठान आहे.या उत्सवाला राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली आहे. कला, साहित्य, रंगसंगती यांचा सुंदर मिलाप इथे पाहायला मिळतो. Bappa.Org हे व्यासपीठ सर्व जगभरातील गणेश भक्तांना आपल्या कथा सांगण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *