Headlines

शेतकरी चंद्रकांत शिंदे मृत्यूप्रकरणी नांदेड पोलिसांची मोठी कारवाई:केएफ फायनान्सच्या मुख्य आरोपीसह 9 जणांना अटक




शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ‘केएफ एंटरप्रायजेस’ या फायनान्स कंपनीशी संबंधित मुख्य आरोपीसह आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनीचा भागीदार, मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली असून, या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. माळकौठा (ता. मुदखेड) येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 533/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून तपासाला गती दिली. भागीदार आणि मॅनेजरलाही अटक पोलिसांनी या प्रकरणात 26 ऑक्टोबर रोजी जयकुमार ऊर्फ शेरा भगवान गायकवाड, शेख अमेर शेख साहेब हुसेन आणि इम्रान खान यांना अटक केली. त्यानंतर शेख मुदस्सीर शेख खदीर यालाही अटक करण्यात आली. केएफ फायनान्सचा भागीदार शेख अहमद ऊर्फ असलम मोहम्मद बशीर आणि कंपनीचा मॅनेजर सुमेध शेकोजीराव डोईबळे यांना 27 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. याशिवाय या प्रकरणातील अन्य आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेड आणि परभणी येथे कारवाई करत आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, काही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणातील इतर बाबींचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वेंजनें, स्थानिक गुन्हे शाखा आणि विजराबाद पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वेंजनें यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणातील नेमकी परिस्थिती आणि आरोपींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. कर्जवसुलीच्या त्रासाबाबत पोलिसांचे आवाहन दरम्यान, कर्जवसुली करताना फायनान्स कंपनीकडून बेकायदेशीर त्रास, धमकी किंवा दबाव टाकला जात असल्यास शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून अथवा भावनेच्या भरात टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारचा त्रास होत असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा…. फडणवीसांवर बोलताना तुमची कुवत आणि औकात काय?:महायुतीत राहून आमचेच पाय तोडणाऱ्या ‘शेखचिल्लीं’ना भाजप भीक घालत नाही; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र रस्ते, पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या योजनांनी वेगाने पुढे जात आहे. मात्र, फडणवीसांविषयी मनात टोकाचा तिरस्कार आणि पोटात मळमळ बाळगून रोज उठून त्यांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांची नेमकी कुवत आणि औकात काय आहे? सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचेच तोंड भाजते. महायुतीत राहायचे, एकाच ताटात जेवायचे आणि आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमचे पाय तोडायचे, हा ‘शेखचिल्ली’सारखा मूर्खपणा चालणार नाही. ज्या फांदीवर बसलात तीच तोडली तर स्वतःचाच कडेलोट होईल, याचे भान मित्रपक्षाने ठेवावे. भाजप कधी टोकाची भूमिका घेत नाही; पण गृहीत धरून सकाळ-संध्याकाळ वार करणार असाल, तर जशास तसे उत्तर द्यायला भाजपही मागे-पुढे पाहणार नाही,” असा आक्रमक आणि संतापजनक इशारा भाजपचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *