![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी यंदाचे साहित्य संमेलन रद्द करून त्यासाठीचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्याची मागणी केली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून, संमेलनासाठी सरकारने १८ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान शंभरावे साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या तयारी आणि आयोजनासाठी हा निधी देण्यात येणार आहे. संमेलनाचे आयोजन करणाऱ्या साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला आहे, असे माने म्हणाले. माने यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळाची स्थिती १९७२ च्या दुष्काळापेक्षाही बिकट आहे. लोकांना पिण्यासाठी आणि जनावरांना देण्यासाठी पाणी नाही. जनावरे कमी भावात विकली जात आहेत. अशा वेळी पुण्यात संमेलनासाठी जेवणावळी आणि लाडू-पेढ्यांवर खर्च केला जाणार आहे. पुण्यात १८८५ मध्ये साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा त्याला ‘ग्रंथकार सभा’ म्हटले जायचे. न्यायमूर्ती रानडे यांनी या सभेसाठी महात्मा फुले यांना आमंत्रित केले होते. मात्र, ही संमेलने सामाजिक उतरंडीतील लोकांसाठी नाहीत, असे म्हणत फुले यांनी पत्र लिहिले होते, असा संदर्भ माने यांनी दिला. संमेलनाची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांवरच अविश्वास ठराव असल्याने संमेलन कोण घेणार आणि त्याची विश्वासार्हता काय, असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला. शेतकरी आत्महत्या करत असताना संमेलनावर खर्च करण्याची गरज आहे का, असेही ते म्हणाले. सरकार, साहित्य संघ आणि महामंडळाने संमेलन रद्द करून हा पैसा शेतकरी, ग्रामीण भाग आणि पाण्यासाठी वापरावा, अशी मागणी माने यांनी केली.
Source link
सुनील माने यांनी साहित्य संमेलन रद्द करण्याची मांगणी केली:18 कोटींचा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी, ग्रामीण भाग आणि पाण्यासाठी वापरण्याचे आवाहन