Headlines

Admin

इम्तियाज यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल:कचरा हस्तांतरण केंद्रावरील काम रोखणे भोवले

एन-१२ भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर काम थांबवल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनपा मार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या वेस्टर्न इमर्जनरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी विशाल विलासराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या…

Read More

मुंबईकरांच्या घरांसाठी ‘मास्टर प्लॅन’; प्रभावी वापरासाठी आता नवे धोरण:घरांच्या वाटपातील अडथळे दूर होऊन पारदर्शकता येणार

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची वेगाने कामे सुरू असताना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या “हाउसिंग स्टॉक’चा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या घरांचा केवळ साठा करून न ठेवता त्यांचा प्रभावी आणि सुनियोजित वापर करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवे धोरण आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या विशेष आढावा…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:वेरूळ येथील अभ्यागत केंद्र एमटीडीसी स्वतः चालवणार; आठ एकरांवर उभारलेले केंद्र, कैलास लेणीची प्रतिकृती पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण

वेरूळ येथील अभ्यागत केंद्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) खासगी एजन्सीकडे चालवण्यासाठी दिले होते. मात्र, एजन्सी तोट्यात गेल्याने हे केंद्र बंद पडले होते. त्यानंतर एमटीडीसीने २ वेळा निविदा प्रक्रिया राबवली; परंतु एकही एजन्सी पुढे आली नाही. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता एमटीडीसी स्वतःच अभ्यागत केंद्र चालवणार आहे. यासाठी मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली असून साफसफाईलाही सुरुवात झाली…

Read More

दिव्य मराठी एक्स्प्लेनर:प्रदूषण रोखण्यामध्ये संभाजीनगरची मजल 50 टक्क्यांवर; मुंबई नापास, एमपीसीबीच्या 61% तपासण्या कागदावरच!

कारखान्यांच्या तपासण्या न करण्यामागे दिले अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) राज्याच्या पातळीवर कुचकामी ठरले आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालानुसार, राज्यात नियोजित भेटींपैकी तब्बल ६१ टक्के भेटी केवळ कागदावरच राहिल्या आहेत. म्हणजेच दर १०० कारखान्यांमागे ६१ ठिकाणी अधिकारी फिरकलेच नाहीत. राज्याची सरासरी तळाला…

Read More

काॅर्पाेरेट जिहाद:शिरखुर्म्यातून गुंगीचे औषधदेऊन तरुणाच्याही धर्मांतराचा झाला प्रयत्न; कोठडीत धक्कादायक कबुली, अमली पदार्थांचा संशय, बळजबरीने नमाज पठण

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक प्रकारांची ‘क्रोनोलॉजी’ समोर येत आहे. पीडित हिंदू तरुणाला जाळ्यात ओढून, त्याला शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देत धर्मांतराचा व बळजबरीने नमाज पठण करायला लावल्याचा संतापजनक प्रकार तपासात उघडकीस आला आहे. . या प्रकरणी अटकेतील चारही संशयित ४ मे पर्यंत कोठडीत आहेत. तपासात स्पष्ट झालेल्या व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी नियोजनबद्ध पद्धतीने…

Read More

‘जो समाजात येत नाही, तो तर दहशतवादी असतो’:कपिलच्या शोमध्ये सुनील पालचा समय रैनावर टोमणा, समयने दिले मजेशीर उत्तर

समय रैना आणि रणवीर अलाहबादिया वर्ल्ड लाफ्टर डे (3 मे) निमित्त द ग्रेट इंडियन कपिल शोच्या एका विशेष एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आले होते, जिथे सुनील पाल यांनी समयला ‘कॉमेडीचा दहशतवादी’ म्हटले होते, तो मुद्दा उपस्थित झाला. शनिवारी आलेल्या या एपिसोडमध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादामुळे समय आणि रणवीर पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसले. या शोमध्ये नंतर…

Read More

अमरावती हादरले!:तरुणीवर अत्याचार करून अश्लील फोटो आईला पाठवले; नराधम गजाआड

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील बेनोडा येथे एका 22 वर्षीय नराधमाने तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बाबू हसन असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. अत्याचारानंतर झालेल्या वादानंतर आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या आई व आजीला पाठवून घृणास्पद कृत्य केले. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी तत्परता दाखवत…

Read More

भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह 'दृष्टी' प्रक्षेपित:ऑप्टिकल आणि रडार दोन्हीने फोटो घेऊ शकतो, असे करणारा जगातील पहिला उपग्रह

भारतीय स्टार्टअप गॅलेक्सआयने रविवारी अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून आपला पहिला उपग्रह ‘दृष्टी’ प्रक्षेपित केला. 190 किलो वजनाचा ‘दृष्टी’ हा भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह आहे. ‘दृष्टी’ उपग्रह एकाच वेळी ऑप्टिकल आणि रडार (SAR) या दोन्ही तंत्रज्ञानाने फोटो घेऊ शकतो. आतापर्यंत जगातील उपग्रह एकतर मल्टी-स्पेक्ट्रल/हायपर-स्पेक्ट्रल (ऑप्टिकल) प्रतिमा घेत होते किंवा SAR तंत्रज्ञानाचा वापर करत…

Read More

वाशिममध्ये चोरांचा हैदोस!:सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरात 17 लाखांचा ऐवज लंपास; तर दुसऱ्या ठिकाणी चोरट्याला महिलांचा चोप

वाशिम जिल्ह्यात आज चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, एका घटनेत चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरातून 17 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर दुसऱ्या घटनेत, बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका चिमुकल्याच्या हातातील कडे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला सतर्क महिलांनी रंगेहाथ पकडले. या धाडसी महिलांनी चोरट्याचा डाव हाणून पाडत त्याला…

Read More

धामणगाव (वैद्य) येथे भीषण आग, 25 घरे भस्मसात:शेतमालकावर गुन्हा दाखल, पालकमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव (वैद्य) येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या भीषण आगीत सुमारे २५ घरे भस्मसात झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गावाशेजारील शेतात जाळण्यात आलेल्या धुरामुळे आणि अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गावात पोहोचली. काही क्षणांतच…

Read More