नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टींकडून बाधित क्षेत्राची पाहणी; 44 हजार पक्षी आणि 39 हजार अंडी नष्ट
नवापूर तालुक्यातील तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर होऊन तब्बल 72 तास उलटल्यानंतर, अखेर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. दरम्यान त्या कार्यालयातून नवापुरातील बर्ड फ्लूचा आढावा घेत होत्या. रविवारी सुट्टी असताना देखील जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी सुट्टीच्या दिवशी पाहणी करण्यासाठी आल्या. या दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कलिंग…