Headlines

इम्तियाज यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल:कचरा हस्तांतरण केंद्रावरील काम रोखणे भोवले




एन-१२ भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर काम थांबवल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनपा मार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या वेस्टर्न इमर्जनरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी विशाल विलासराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, एन-१२ येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर २ मे रोजी दिवसभर कामकाज सुरळीत सुरू होते. दुपारी ४ वाजता मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी या केंद्राची पाहणी केली. मात्र, सायंकाळी ६.५१ वाजेच्या सुमारास माजी खासदार इम्तियाज जलील, समीर बिल्डर आणि काकासाहेब काकडे यांनी केंद्रावर येऊन येथे कोणतेही काम झाले नाही पाहिजे, असे सांगत काम थांबवले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली. यामुळे कर्मचारी घाबरून गेले. तसेच कर्मचारी हार्दिक पांचाळ यांचा मोबाइल हिसकावून फेकून दिला आणि सुरक्षा रक्षकांनाही धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *