सत्ताधाऱ्यांना कायदा हातात घेण्याचे 'लायसन्स' मिळालेय का?:ज्या प्रभू श्रीरामाच्या कृपेने सत्तेत आले, त्यांच्याच दानपेटीवर दरोडा टाकला- भास्कर जाधव
राज्यात सध्या सत्ताधारी पक्षाचे लोक अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून त्यांना कोणालाही मारण्याचे आणि कुठेही कायदा हातात घेण्याचे जणू ‘लायसन्स’च मिळाले आहे. तुम्ही काहीही करा, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशाच अविर्भावात सत्ताधारी पक्षाचे वर्तन सुरू आहे, अशा तीव्र शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे….