बाडगीचापाड्यात आठवड्यात तिसरा बछडा जेरबंद:एकाच मादीची तिन्ही बछडे असण्याचा अंदाज; शेतकऱ्यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण
प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील ननाशी जवळील बाडगीचापाडा परिसरात बिबट्यांचा वावर दहशतीचा विषय बनला आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे हे क्षेत्र बिबट्यांचे हॉटस्पॉट ठरत आहे. मंगळवारी पहाटे ८ ते १० महिने वयाचा नर बिबट वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. आठवडाभरात या एकाच ठिकाणाहून पकडलेला हा तिसरा बिबट्या आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने बाडगीचापाडा येथे…