बोरिवलीचा 'मंगलकुंज' घोटाळा:200 गुजराती कुटुंबांची पुनर्विकासात फसवणूक; राहिवाशांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव
बोरिवली (पश्चिम) येथील ऐतिहासिक इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या समोरील ‘मधुमिलन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’ (मंगलकुंज) सध्या भ्रष्टाचार आणि गंभीर प्रशासकीय अनियमिततेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 66 वर्षे जुन्या असलेल्या या प्रतिष्ठित सोसायटीत 90 टक्के रहिवासी गुजराती भाषक असून, त्यामध्ये कच्छी जैन समाज आणि इतर गुजराती समुदायाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मॅनेजिंग कमिटीने पुनर्विकासाच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीमुळे आणि…