![]()
मराठी भाषा प्राचीन असून उपक्रमशीलतेद्वारे मराठी भाषेचा अभिजाततेचा दर्जा अधोरेखित होत राहिल, असा विश्वास प्रसिध्द सिने- नाट्य कलावंत आनंद इंगळे यांनी व्यक्त केला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे अभिमंच, अॅमस्टरडमच्या संयुक्त विद्यमाने विश्व मराठी एकांकिका, बालनाट्य आणि कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृह संपन्न झाला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंगळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतपाल नितीन ढमाले, उद्योजक दिलीप कोटीभास्कर, हेरिटेज क्लबचे अध्यक्ष शुभ्रो सेन आणि सचिव सोनाली चौबळ उपस्थित होत्या. यावेळी बोलताना आनंद इंगळे म्हणाले की, मराठी भाषा टिकविण्यात अशा उपक्रमांचे योगदान मोठे असून अशा स्पर्धा सातत्याने आयोजीत करणे आणि त्यात भाग घेत राहणे आवश्यक आहे. यावेळी बोलताना नितीन ढमाले म्हणाले की, मराठी भाषा टिकण्यासाठी आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्या दृष्ट्रीने हा उपक्रम स्तुत्य असून कला आणि साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषा नवीन पिढीपर्यंत पोहोचवली जात आहे. यावेळी प्रसिद्ध उद्योजक दिलीप कोटीभास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. लीना गोगटे आणि अविनाश ओगले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेबाबत माहिती देताना अविनाश ओगले म्हणाले की, या स्पर्धेसाठी बेल्जियम आणि स्विझरलँड येथून प्रथमच प्रवेशिका आल्या असून १२ देशांतून २९ संघांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
Source link
मराठी भाषेचा अभिजात दर्जा उपक्रमांनी अधोरेखित होईल:रोटरी क्लबच्या विश्व मराठी एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आनंद इंगळे यांचे मत