![]()
सत्ताधाऱ्यांकडून ‘हिंदू-मुस्लीम’ करत देशभरात अराजकता माजवली जात आहे. मात्र, जनतेचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये म्हणून आम्ही आंदोलन केले, तर त्याला तुम्ही अराजकता म्हणणार का? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच, हे कृत्य देशाच्या भविष्यासाठी आणि उद्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून, सरकारने लोकशाही संपवण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपने मोठी फौज उभी केली आहे. मात्र, राहुल गांधी हे वाघ आहेत आणि त्यांना घेरण्याचे काम भाजपकडून सुरू असले, तरी ते एकटेच सर्वांना पुरून उरत आहेत. त्यांच्या आजी-वडिलांचे रक्त या देशाच्या मातीत मिसळले आहे. जे इंग्रजांना कधीच घाबरले नाहीत, ते या व्यवस्थेला काय घाबरणार? असा जोरदार टोला त्यांनी भाजपला लगावला. 13 कोटी मतदानाची चोरी झाल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार म्हणाले की, मोदी सरकार इतक्या इरेस का पेटले आहे? 13 कोटी मते चोरीला गेल्याचे आता सिद्ध झाले आहे. संविधानाच्या चौकटीत न बसता ज्या ज्ञानेशकुमारांची नियुक्ती करण्यात आली, त्यांना हटवण्यासाठी आज संपूर्ण देशभरात आंदोलन होत आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांच्या आंदोलनाला ज्या प्रकारे हाताळले जात आहे आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ज्या प्रकारे त्रास दिला गेला, त्यावरून या सरकारने देशातील लोकशाही संपवण्याचाच जणू विडा उचलला आहे, असे स्पष्ट दिसते. सोशल मीडियावर सरकारवर टीका विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांसह जनतेचे जे आंदोलन सुरू आहे, त्यावरून जनता राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. सरकारने सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली तरी जनता त्यांना शिव्या घालते, मात्र याची थोडीही लाज या सरकारला वाटत नाही. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज होत असेल, तर सामान्य माणसांच्या हालांची कल्पना न केलेलीच बरी. दिल्ली पोलिसांचा वापर विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशातील सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आला, तर हे सरकार त्याला गोळ्या घालून पुरावे संपवेल, गुंड पाठवून त्यांचे खून करेल आणि त्यांना संपवून टाकेल, हे करायलाही हे सरकार मागेपुढे पाहणार नाही, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या आंदोलनात दिल्ली पोलिसांचा वापर करून ते आंदोलन क्रूरपणे चिरडण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र, राहुल गांधी देशातील लोकशाही वाचवण्यासाठीच हा लढा देत आहे. हे ही वृत्त वाचा तात्काळ निवडणुका घ्या, भाजप औषधालाही उरणार नाही:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दरदिवशी दिल्लीत काय करतात?- संजय राऊत
एसआयआरचे समर्थन म्हणजे घोटाळा करणे असे होत नाही, केवळ मृत व्यक्तीची नावे मतदारयाद्यांमधून काढणे असे असते, किंवा त्या जागेवर राहत नाही त्यांचा शोध घेणं हा आहे. केवळ एखाद्या भागातून शिवसेनेला मतदान होत आहे म्हणून ती नावे काढायची, बंगालमधील एक वर्ग तृणमूल काँग्रेसला मतदान करतो म्हणून त्याला मतदानापासून वंचित ठेवायचे याला एसआयआर म्हणत नाही. यावर पोस्टकरत काही ज्ञानेशकुमारचे समर्थन होत नाही. निवडणूक आयोगाने फडणवीस आणि भाजपला काय वकील म्हणून नेमले आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Source link