![]()
हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात फटाका गोदामामध्ये आगीवर नियंत्रण मिळवितांना गंभीर जखमी झालेल्या कृष्णा अग्रवाल या तरुणाच्या मदतीसाठी अग्रसेन सेवा समिती सरसावली असून महाराजा अग्रसेन जयंती निमित्त रविवारी ता. 11 आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करून जमा होणारी रक्कम अग्रवाल कुटुंबाच्या हवाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. हिंगोली शहरात महाराजा अग्रसेन जयंती उत्साहात साजरी केली जाते. या जयंती सोहळ्या निमित्त आठ दिवस विविध सांस्कृतीक,धार्मिक कार्यक्रम घेतले जाता. या शिवाय महिला, पुरुष व बालकांसाठी विविध स्पर्धाचे आयोजनही केले जाते. तसेच शहरातून भव्य शोभायात्रा काढली जाते. या स्पर्धा व कार्यक्रमात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च केला जातो. अग्रसेन सेवा समिती, अग्रवाल महिला मंडळ व अग्रवाल बहु मंडळ व समाजातील नागरीकांच्या वतीने ही रक्कम जमा केली जाते. त्यानुसार यावर्षीचे नियोजन देखील करण्यात आले होते. दरम्यान हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात सोमवारी ता. 5 रात्रीच्या सुमारास फटाक्याच्या गोदामाला भिषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवितांना व बचाव कार्य करतांना शहरातील तरुण कृष्णा अग्रवाल हा गंभीररित्या भाजल्या गेला. त्याला उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. त्याचे वडिल अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. या घटनेतील गंभीर जखमी कृष्णाच्या उपचारासाठी लागणारा खर्च व त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता यावर्षी महाराजा अग्रसेन जयंती कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून बचत होणारी सुमारे 5 लाख रुपयांची रक्कम त्याच्या कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात आली असून आणखी रक्कम जमा करून दिली जाणार आहे. अग्रसेन सेवा समितीच्या या निर्णयाचे कौतूक केले जात आहे. रविवारी केवळ आरती केली जाणार पदाधिकारी सेवा समिती पंकज अग्रवाल म्हणाले की, यावर्षी दुर्घटनेमुळे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. रविवारी ता. 11 सकाळी आकरा वाजता महाराजा अग्रसेन चौक येथे महाराजा अग्रसेन यांची आरती केली जाणार असून त्यानंतर प्रसादाचे वाटप होईल. शोभायात्रा व इतर सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. कृष्णाच्या मदतीसाठी आणखी रक्कम जमा केली जात आहे.
Source link
हिंगोलीत फटका गोदाम आग प्रकरण:भाजलेल्या तरुणासाठी अग्रसेन सेवा समिती सरसावली; जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करून 5 लाखांची मदत