Headlines

Navnath Ban Attacks Rohit Pawar Over MPSC Protest Controversy


एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक चांगलीच रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आंदोलनाद

.

रोहित पवारांना आव्हान

“माझ्यावर व्यक्तिगत टीका करून मला अडीचशे मार्कांचा पेपर सोडवायला दिला होता, आज मी तो सोडवतो,” असे म्हणत नवनाथ बन यांनी नाथ परंपरेचा इतिहास सांगितला. आदिनाथांपासून ते संत ज्ञानेश्वर-तुकारामांपर्यंतची नाथ आणि वारकरी परंपरा त्यांनी पुराव्यांसह मांडली.

यावेळी रोहित पवारांना आव्हान देत ते म्हणाले, “माझा रोहित पवार आणि विवेकानंद या दोघांना प्रश्न आहे. मी त्यांना मुभा देतो की त्यांनी किमान पुस्तकात बघून तरी रामरक्षा, गीतेचे श्लोक वाचून दाखवावेत किंवा वारकरी संप्रदायातील एखाद्या अभंगाचे विवेचन करावे. बघूया या ५०० मार्कांच्या पेपरमध्ये रोहित पवारांना किती मार्क पडतात!”

‘बारामती स्टँडवर चिंचा-बोरं विकल्याने संस्कृत येत नाही का?’

रोहित पवारांना संस्कृत वाचता येणार नाही, असा टोला लगावताना बन म्हणाले, “रोहित पवारांचे बालपण बारामतीच्या बस स्टँडवर चिंचा आणि बोरं विकण्यात गेले आहे. त्यामुळे त्यांचा संस्कृत सुभाषितेचा अभ्यास नसेल. जर त्यांना हा पेपर कठीण वाटत असेल, तर मी त्यांना मल्टिपल चॉईस (बहुपर्यायी) प्रश्न देतो. त्यांनी किमान वारकरी संप्रदायाचे सोपे अभंग तरी वाचून दाखवावेत. पण इतरांना काहीच येत नाही आणि आपल्यालाच सर्व येते, हा अहंकार त्यांनी आधी सोडावा.”

“आमच्या आजोबांनी भ्रष्टाचार करून जमिनी लाटल्या नाहीत”

नवनाथ बन यांनी पवार घराण्यावर थेट निशाणा साधला. “मी ओबीसी आणि भटक्या समाजातून येतो. माझ्या आजोबांनी भ्रष्टाचार करून स्वतःची घरे भरली नाहीत किंवा जमिनी लाटल्या नाहीत. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून निजामाच्या आणि रजाकारांच्या विरोधात लढा दिला, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी घरदार विकले. त्यामुळे आम्हाला स्थलांतरित व्हावे लागले, याचा मला अभिमान आहे. पण तुमच्या आजोबांनी कशी घरे भरली हे सर्वांना माहीत आहे,” असा घणाघाती आरोप नवनाथ बन यांनी केला.

नवनाथ बन यांच्या या पलटवारामुळे आता रोहित पवार आणि विवेकानंद या ‘ओपन चॅलेंज’ला काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.

——————

ही बातमी पण वाचा..

MPSC आंदोलनाचा नववा दिवस:प्रकृती बिघडल्याने 3 विद्यार्थ्यांनी सोडलं उपोषण, रोहित पवार म्हणाले- अध्यक्षांच्या विकेटशिवाय आंदोलनाची सांगता नाही

पुण्यात एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे गेल्या नऊ दिवसांपासून हक्कांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात काही विद्यार्थी अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे उपोषणाला बसलेल्या सातपैकी तीन विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.