Headlines

'सोमेश्वर'चे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी:दादांच्या विचारांना सुरुंग लावून भाजपशी हातमिळवणी भोवली; प्रचाराच्या सांगता दिनीच कारवाई




पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या नीरा-वागज परिसरातील ‘श्री छत्रपती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्या’च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत ऐन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (अजित पवार गट) उघडपणे बंडखोरी करत, थेट भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मदतीने स्वतंत्र तिसरे पॅनल उभे करणारे कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सर्व बंडखोर संचालकांची पक्षातून तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी ही कठोर शिस्तभंगाची कारवाई जाहीर केली असून, या कारवाईमुळे सोमेश्वरच्या रणांगणात प्रचंड राजकीय धुरळा उडाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची आक्रमक व स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, ज्येष्ठ नेते संभाजी होळकर, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव आदी प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षविरोधी कृत्य अजिबात खपवून घेणार नाही; तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांचा इशारा पुरुषोत्तम जगताप यांच्यावरील कारवाईचे कारण स्पष्ट करताना तालुकाध्यक्ष संदीप बांदल म्हणाले, “आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विकासाचे विचार पुढे घेऊन जात असताना विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्यासोबत गेलेल्या काही संचालकांनी पक्षाच्या अधिकृत धोरणाविरोधात बंड पुकारले. पक्षाने वारंवार समज देऊनही त्यांनी भाजपच्या छुप्या व उघड पाठिंब्याने स्वतःचे स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उतरवले.” पक्षातून कायमची गच्छंती “हा सरळसरळ पक्षविरोधी आणि शिस्तभंग करणारा प्रकार आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात काडीचेही स्थान नाही. म्हणूनच आदरणीय अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या पॅनलमधील संबंधित बंडखोरांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात येत आहे.” प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; 21 जागांसाठी 83 उमेदवार रिंगणात! सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. या निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ८३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांचे भाजप-समर्थित पॅनल अशा तिरंगी लढतीमुळे सोमेश्वरची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरली आहे. तिन्ही पॅनलची ताकद आणि आजच्या सांगता सभांची रणनीती 1. श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) चिन्ह: कपबशी, पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सुनेत्रा पवार या पॅनलचे थेट नेतृत्व करत आहेत. सांगता सभा: सुनेत्रा पवार, माजी मंत्री विजय शिवतरे आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही सांगता सभा पार पडत असून, कारखान्यातील आर्थिक शिस्त आणि अजितदादांच्या विकासकामांचा दाखला देत मतदारांना साद घातली जात आहे. 2. सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) चिन्ह: किटली, युवा नेते युगेंद्र पवार या पॅनलची धुरा सांभाळत आहेत. सांगता सभा: या सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. कारखान्यातील सभासदांचे हित, ऊस दर आणि कारभारातील कथित गैरप्रकारांवरून हे पॅनल सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. 3. लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल (बंडखोर – भाजप युती) चिन्ह: शिट्टी, पक्षातून हकालपट्टी झालेले विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप. सांगता सभा: या पॅनलला भाजपचे उघड बळ लाभले असून, सांगता सभेला माजी आमदार व भाजप नेते संजय जगताप यांच्यासह शरद पवार गटातील पुरंदरचे नाराज नेते माणिकराव झेंडे आणि सुदाम इंगळे यांची उपस्थिती लाभणार आहे. दादांचे नाव वापरूनच अजित पवार गटाला आव्हान देण्याची खेळी जगताप यांनी खेळली आहे. 11 तारखेला मतदान; सुनेत्रा पवार वि. युगेंद्र पवार वि. भाजप-जगताप प्रतिष्ठेची लढाई! बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ही लढत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी तसेच भाजपसाठी राजकीय अस्तित्वाची मानली जात आहे. सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार या दोघांचीही प्रतिष्ठा या कारखान्याच्या निकालावर पणाला लागली आहे. तर दुसरीकडे पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या जोरावर दोन्ही पवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या तिन्ही सांगता सभांमधून कोण कोणावर कसे शाब्दिक वार करणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर रविवार, 11 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून, सोमेश्वरचा साखरसम्राट कोण ठरणार, याचा फैसला मतपेटीतून होणार आहे. ——————————————– हेही वाचा… काँग्रेसची डबल ढोलकी स्वतःच्याच मंत्र्यांच्या विधानाने उघडी!: संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी कपिल सिब्बल यांचा जुना व्हिडिओ केला शेअर मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट संसदेतील ऐतिहासिक पुराव्यासह काँग्रेसचा बुरखा फाडला आहे. संपुआ (UPA) सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेचे ठाम समर्थन करत दिलेले स्पष्टीकरण आणि अधिकृत रेकॉर्डवरील व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. “काँग्रेसच्या राजकारणाचे रंग सोयीनुसार बदलले, तरी संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत,” असा घणाघाती टोला लगावत फडणवीस यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *