Headlines

Admin

एआयसीटीईचा निर्णय; यंदा पहिल्या वर्षाचे प्रवेश बंद:गैरप्रकार, शिक्षकांचा अभाव; राज्यातील 12 अभियांत्रिकी महाविद्यालयांना टाळे

वारंवार सांगूनही भौतिक सुविधांचा अभाव, मान्यताप्राप्त आणि तज्ज्ञ शिक्षक नाहीत. गैरप्रकार या सर्व त्रुटींमुळे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) २०२५-२६ शैक्षणिक वर्षात देशातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालय टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ९५० अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालये पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांतील आहेत. एआयसीटीईच्या…

Read More

न्यायालय परिसरात वकिलांवर हल्ले:हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, एसआयटी स्थापन करण्याची मागणी

महाराष्ट्रातील न्यायालयीन परिसरांमध्ये वकिलांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. राज्यात वकिलांवरील हिंसक हल्ले आणि न्यायालयीन परिसरातील ढासळती सुरक्षा व्यवस्था याविरोधात विधिज्ञ ॲड. शोमितकुमार साळुंके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ म्हणून फौजदारी जनहित याचिका दाखल…

Read More

बागलाणमध्ये 3 लाख मतदारांची होणार पडताळणी:288 बीएलओ व 288 सहाय्यक नियुक्त; 7 ऑक्टोबरपर्यंत राबवणार उपक्रम‎

राज्यात ३० जूनपासून सुरू झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला बागलाण तालुक्यात प्रारंभ झाला असून, तालुक्यातील तब्बल ३,००,१७९ मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यासाठी २८८ बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) व २८८ बीएलओ सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून रोजी सटाणा येथील डिव्हाईन विद्यालयात…

Read More

Padmavibhushan Dr. Teejan Bai Passes Away; India Ranks 125 in Global Passport Index 2026

Marathi News National Padmavibhushan Dr. Teejan Bai Passes Away; India Ranks 125 In Global Passport Index 2026 1 तासापूर्वी कॉपी लिंक ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 रँकिंग जाहीर 5 जुलै रोजी ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 रँकिंग जाहीर झाली. या रँकिंगमध्ये भारत 125व्या स्थानावर आहे. 2025 साली भारत या रँकिंगमध्ये 124व्या स्थानावर होता. या रँकिंगमधील टॉप 10…

Read More

मालेगावात रखडलेल्या गटार कामांमुळे रस्त्यांवर चिखल आणि पाण्याचे डबके:रखडलेली विकासकामे पूर्ण करून पाण्याचा निचरा करण्याची नागरिकांची मागणी‎‎‎

महिनाभर प्रतीक्षा लावलेल्या पावसाने शहरात हजेरी लावताच मालेगावातील अनेक नागरी वसाहतींमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भुयारी गटारांची रखडलेली कामे, खोदून ठेवलेले रस्ते आणि अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे अनेक भागांत चिखल व साचलेल्या पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक ३…

Read More

पिळकोसच्या उपसरपंचपदी शोभा वाघ यांची अविरोध निवड:संभाव्य तणावाची शक्यता टळली; गावात जल्लोष‎

तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार उपसरपंच मधुकर जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदासाठी दोन सदस्य इच्छुक असल्याने दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाऊसाहेब जाधव, मधुकर जाधव, मोहन वाघ आणि…

Read More

हेमंत भावसार यांनी दुचाकीवर गाठले लडाख:6,434 किमीचा प्रवास; उमलिंग-ला मार्ग गाठत साकारले अनेक वर्षांचे स्वप्न‎

येथील दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा भावसार ऑप्टिशियनचे संचालक हेमंत रविंद्र भावसार यांनी दुचाकीवर प्रवास करून लडाखची ‘सोलो’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. तब्बल ६,४३४ किलोमीटरचा खडतर प्रवास करत त्यांनी जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्त्यांपैकी एक असलेल्या उमलिंग-ला मार्गावरून प्रवास करून अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. भावसार यांना मोटारसायकल भटकंतीची विशेष आवड आहे. १५ जून…

Read More

अश्लील फोटोवर 2 निहंगांत वाद, ऑडिओ:परवाना म्हणाला – विक्की थॉमसने लीक केली, तो तुमचा माणूस; दुआबी म्हणाला- जत्थेदारकडे गेलो, हल्ला झाला

निहंग बरजिंदर सिंग परवाना आणि निहंग भगत सिंग दुआबी यांच्यात २० मिनिटे झालेल्या फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. संभाषणाची सुरुवात सामान्य होती, पण थोड्याच वेळात निहंग जसदीप सिंगचे अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या वादावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. परवाना म्हणाले की, फोटो लीक करण्यात निहंग विक्की थॉमसचा हात आहे आणि तो दुआबीच्या बाजूचा माणूस…

Read More

रुंदीकरणाच्या कामाने सिन्नर-ठाणगाव मार्गावर अपघाताची भीती:वृक्ष धोक्यात, तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी

सिन्नर-ठाणगाव मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक जुन्या वृक्षांची मुळे उघडी पडली असून ही झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघाताची भीती व्यक्त होत आहे. विकासकामांदरम्यान अनेक वृक्षांच्या बुंध्याभोवतीची माती काढून टाकण्यात आल्याने त्यांची मुळे पूर्णपणे उघडी पडली आहेत. काही ठिकाणी वृक्ष केवळ मुळांच्या आधारावर उभे…

Read More

जनआरोग्य योजनेतील गैरप्रकार त्वरित थांबवा:भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीची मागणी‎

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काही रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पूर्णपणे मोफत उपचार मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बागलाण तालुका महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन व यशवंत मोफत रुग्णसेवा समितीने दिला आहे. सटाणा दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांना तालुका सचिव श्याम बागडणे यांनी निवेदन देऊन…

Read More