318 वर्षांच्या परंपरेत प्रथमच!:संत मुक्ताई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात; हजारो वारकऱ्यांचा भक्तिभावाने सहभाग
तब्बल 318 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी प्रथमच जालना शहरात पार पडला. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. हरिनामाच्या गजराने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. संत मुक्ताई पालखीचे जालन्यात शनिवारी…