Headlines

Admin

राममंदिर देणगी चोरी- सुप्रीम कोर्टाचा तात्काळ सुनावणीस नकार:पोलीस आरोपींचे खाते तपासण्यासाठी बँकेत पोहोचली; आज कोर्टात हजर करणार, रिमांड मागणार

अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वकील अनुप अवस्थी यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी केली. न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्यास नकार देत विचारले की, यामध्ये इतकी घाई कशाची आहे? न्यायालयाच्या सुट्ट्या संपल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी होईल. दरम्यान, पोलीस सोमवारी सकाळी १०.३० वाजता कारागृहात असलेल्या ८ आरोपींच्या खात्यांची तपासणी…

Read More

बोजवारा:शहरात दीड तास पाऊस, रस्त्यावर पाणी; नालेसफाईचा दावा पाण्यात, गल्लीत नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी

लातूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी (दि. २८) दुपारी आणि सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. . दुपारी साडेतीनच्या सुमारास आलेल्या दीड तासाच्या पावसामुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण कार्यालय आणि सर्व शिक्षा अभियान कार्यालयाच्या आवारात गुडघाभर…

Read More

Kangana ranaut react to a claim that she cut co star vir das lips in kissing scene

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सिद्धार्थ काननच्या पॉडकास्टमध्ये पत्रकार सिमी चंडोक यांनी दावा केला आहे की, ‘रिव्हॉल्वर राणी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किसिंग सीनमध्ये कंगनाने सह-अभिनेता वीर दासचे ओठ चावले. त्या महिलेने दावा केला आहे की, वीर दास आजही तो धक्का विसरू शकलेला नाही. पॉडकास्टचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका युझरने लिहिले आहे की, वीर दास प्रत्येक मुद्द्यावर बोलतो,…

Read More

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय:कोकण, विदर्भासह 22 जिल्ह्यांना पावसाचा इशारा; चंद्रपूर- गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊन २ ते ८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह विदर्भात सर्वदूर समाधानकारक पाऊस बरसेल, बुलडाणा जिल्ह्यात मात्र जुलै महिन्यात १० तारखेनंतर पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज…

Read More

मतदान गर्दीचे नियमन करेल रोबोट:डॉ. सोलापुरेंच्या संशोधनाला पेटंट, वाचा रोबोटची वैशिष्ट्ये

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी लातूरमधील राज्यशास्त्राचे अभ्यासक व संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. लातूरचे लेखक व अभ्यासक डॉ. राजशेखर सोलापुरे आणि त्यांचे सहकारी डॉ. रवींद्र माळी, डॉ. वैभव सूर्यवंशी, डॉ. सचिन वेरुळकर आणि डॉ. शेखर आष्टीकर यांनी विकसित केलेल्या ‘स्वायत्त मतदार सहाय्य रोबोट’ला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत पेटंट मंजूर केले…

Read More

शिवाजीराव शिंदे यांच्या शोकसभेत आठवणींना उजाळा:तत्त्वनिष्ठ नेतृत्वाला अखेरचा निरोप; सभेत 40 पेक्षा जास्त मान्यवरांकडून भावना प्रकट‎

महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे यांचे २१ जून २०२६ रोजी कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि पुरोगामी विचारांचा दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त करत लातूरकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लातूरमधील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने आयोजित या शोकसभेला नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी…

Read More

समय रैनाच्या लेटेंटवर पुन्हा वाद:वैद्यकीय कारणाने बाहेर जाणाऱ्या मुलीवर आक्षेपार्ह टिप्पणी, शिवसेना नेत्या म्हणाल्या- काहीच धडा घेतला नाही

कॉमेडियन समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट सीझन २ मुळे पुन्हा वादात सापडला आहे. खरं तर, सीझन २ च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये समयने एका मुलीवर जवळपास तशीच टिप्पणी केली आहे, ज्यामुळे प्रणीत मोरे वादात सापडला होता आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. खरं तर, नुकताच इंडियाज गॉट लेटेंट सीझन २ च्या दुसऱ्या एपिसोडशी संबंधित एक क्लिप…

Read More

शेतकरी मेळावा:आधुनिक शेती, संघटन शक्‍तीनेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतील- पद्मश्री डॉ. श्रीरंगदादा लाड

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची संघटन शक्ती या दोनच गोष्टींच्या जोरावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी भारतीय किसान संघ राज्यभर मेळावे घेऊन शेतकऱ्यांना संघटित करत आहे. आगामी काळात आपल्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष करावा लागेल, असा विश्वास पद्मश्री कृषी संशोधक डॉ. श्रीरंगदादा लाड यांनी व्यक्त केला. अहमदपूर तालुक्यातील राजूर येथील…

Read More

दिव्य मराठी मुलाखत‎:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही

जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत-जास्त दर्जेदार शिक्षण मुलांना कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पारदर्शकता, गतिमान प्रशासन, लोकाभिमुख कारभार यांना प्राधान्य देणार असल्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. विशेषतः शिक्षण, आरोग्य, ई-ऑफिस प्रणालीचा विस्तार…

Read More

उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी:चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, 'खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच' असल्याचा पुनरुच्चार

“उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत,” अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजप विचारांसाठी,…

Read More