Headlines

Admin

Most Powerful Passports Mean Highest Taxes: Global Passport Index 2026

सुनयना चड्ढा. नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जगात व्हिसाशिवाय जास्त देशांमध्ये प्रवास करण्याचं स्वातंत्र्यही मोठ्या किमतीसोबत येतं. ‘ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026’ नुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांचे नागरिक सर्वाधिक करही भरतात. या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या स्वीडनसोबत फिनलंड आणि डेन्मार्कसारख्या देशांमध्ये प्रभावी कर 56-57% पर्यंत पोहोचतो. याच करातून तिथे मोफत शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा…

Read More

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात…

Read More

स्वायत्त संस्थांच्या फेलोशिपला मर्यादा:आता प्रत्येक संस्थेतून केवळ 100 विद्यार्थ्यांची निवड होणार, नवे निकष लागू

स्वायत्त संस्थांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. यानुसार, प्रत्येक संस्थेसाठी कमाल १०० विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचा आदेश जारी केला असून, ‘बार्टी’च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. शासनाच्या ताज्या आदेशानुसार, टीआयआरटीआय (आरती), बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या स्वायत्त संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती…

Read More

अयोध्या राम मंदिर देणगी अपहार:युवक काँग्रेसचा 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह, डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात अमरावतीत आंदोलन

अमरावती येथे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने आज, शनिवारी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित अपहार झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिरात हे प्रतीकात्मक आंदोलन झाले. यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा निषेध केला. डॉ. देशमुख…

Read More

पंढरीच्या 50 वाऱ्या करणारे नानाजी गायकी यांचे निधन:85 व्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास, निंभी येथे अंत्यसंस्कार

मोर्शी तालुक्यातील निंभी येथील प्रसिद्ध वारकरी आणि सेवानिवृत्त शिक्षक ह.भ.प. नानाजी गायकी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी, ११ जुलै रोजी सकाळी निंभी येथील मोक्षधाममध्ये विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यात पंढरपूरच्या ५० वाऱ्या पूर्ण केल्या होत्या. नानाजी गायकी यांनी आपल्या हयातीत पंढरीच्या वारीचे अर्धशतक पूर्ण केले…

Read More

अमरावतीत 'हरित अमरावती'साठी वृक्षारोपण:बुद्ध जयंती उत्सव समिती, सुखाय फाउंडेशनचा 'एक वृक्ष-एक जीवन' संकल्प

अमरावती येथे पर्यावरण संवर्धन आणि ‘हरित अमरावती’च्या निर्मितीसाठी बुद्ध जयंती उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता दुभाजकामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग होता. यावेळी वाढते तापमान, वृक्षतोड, शहरीकरणामुळे घटणारी हरित संपदा आणि पर्यावरणाचा बिघडलेला समतोल यावर जनजागृती करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी ‘दिव्य…

Read More

डॉ. अरुण मोंढे विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख:अमरावती महानगर शाखेत विशेष नियुक्ती

अमरावती येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अरुण मोंढे यांची विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) अमरावती महानगर शाखेतील विशेष संपर्क विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान, बोडणा येथे आयोजित विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या जिल्हास्तरीय अभ्यास वर्गात करण्यात आली. या अभ्यास वर्गाला विहिंपचे प्रांत संघटन मंत्री विष्णू देशमुख, जिल्हाध्यक्ष अनिल साहू,…

Read More

डॉ. श्रीकांत वऱ्हेकर यांची अमरावती विभागीय कृती कक्षात निवड:पर्यावरण संरक्षणातील योगदानामुळे महाराष्ट्र शासनाने केली नियुक्ती.

प्रा. डॉ. श्रीकांत वऱ्हेकर यांची महाराष्ट्र शासनाने अमरावती विभागीय वातावरणीय कृती कक्षात निमंत्रीत सदस्य म्हणून निवड केली आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. डॉ. वऱ्हेकर हे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे (वेक्स) उपाध्यक्ष देखील आहेत. श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पर्यावरण शास्त्र विभागात प्राध्यापक असलेले डॉ. वऱ्हेकर…

Read More

शहर स्वच्छतेसाठी आयुक्त अमोल येडगे स्वतः मैदानात:दोन दिवसांत 1 लाखांचा दंड वसूल, 'संभाजीनगर पॅटर्न'ची चर्चा

छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छतेसाठी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून ‘विशेष संयुक्त पाहणी पथके’ स्थापन करण्यात आली आहेत. आयुक्त स्वतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरून या मोहिमेची पाहणी करत आहेत. हा अभिनव ‘छत्रपती संभाजीनगर पॅटर्न’ यशस्वी झाल्यास तो देशासाठी कचरा व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे. शहराच्या विविध भागांवर लक्ष ठेवण्यासाठी २९…

Read More

ढोरेगाव शाळेत 'दप्तरमुक्त शनिवार' उपक्रम:विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, पोषणमूल्ये व अन्नसुरक्षेचे धडे

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे ‘आनंददायी, दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शेतीविषयक ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. अजित सीड कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर मोमीन शफी यांनी यावेळी विशेष मार्गदर्शन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक कृषी, पोषण आणि अन्नसुरक्षेविषयी जागरूकता…

Read More