Headlines

Admin

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 7 मृतदेह आढळले, मृतांची संख्या 8 वर, एकाचा शोध अद्याप सुरू; 72 तासांपासून शोधकार्य चालू

पुणे, प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनेत आज चौथ्या दिवशी शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे. अद्याप एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मोशी येथील कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या…

Read More

नेरपिंगळाईत सहकार सप्ताहानिमित्त महिला प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम:गोदाम व्यवस्थापन, सहकाराचे महत्त्व यावर मार्गदर्शन

नेरपिंगळाई येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सहकार सप्ताहानिमित्त महिला प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला, शेतकरी, सभासद तसेच सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नागपूर येथील धनंजय गाडगीळ सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या प्राचार्य सीमा मिश्रा आणि मोर्शीच्या सहायक निबंधक स्वाती गुडधे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. प्राचार्य…

Read More

मत्स्यविज्ञान महाविद्यालयाने महिलांना दिले व्यावसायिक प्रशिक्षण:गोड्या पाण्यातील माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे धडे

मोर्शी येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालय आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण महिलांसाठी तीन दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना गोड्या पाण्यातील माशांपासून ‘मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि समारोपीय कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मोर्शी तालुक्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचतगटांच्या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्यांना…

Read More

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत घेतली नाही

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. ‘सर्गी’ टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्टर आणि अभियंत्यांचा हा प्रयोग वैद्यकीय जगात एक मोठा बदल घडवून आणू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणताही विशेष रोबोट तयार करण्यात आला नव्हता. डॉक्टरांनी बाजारात उपलब्ध असलेल्या दोन सामान्य…

Read More

आशासेविका, गटप्रवर्तकांनी 'काळा दिवस' पाळत निदर्शने केली:शासनाच्या धोरणांचा निषेध; मानधनवाढीची अंमलबजावणी करण्याची मागणी

देशभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळत शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने केली. अमरावती जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर आशा सेविका व गटप्रवर्तकांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर यांच्यामार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन पाठवण्यात आले. अमरावती शहरात सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) नेतृत्वाखाली हे आंदोलन…

Read More

न उगवलेल्या सोयाबीनला नुकसान भरपाई मिळणार:मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, आमदार अडसड यांच्या मागणीनंतर नियोजन

अमरावती जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी, अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, न उगवलेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. धामणगावचे आमदार प्रताप अडसड यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी जिल्ह्याचे एकूणच चित्र मुख्यमंत्र्यांसमोर…

Read More

लाडकी-पिंपळखुटा-बोडना रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य:निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त, अपघातांची भीती

मोर्शी प्रतिनिधी: लाडकी, पिंपळखुटा आणि बोडना गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही, एका खासगी कंपनीने बांधलेल्या या रस्त्यावर माती आणि मुरमाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या तिन्ही गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या…

Read More

Most Powerful Passports Mean Highest Taxes: Global Passport Index 2026

सुनयना चड्ढा. नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जगात व्हिसाशिवाय जास्त देशांमध्ये प्रवास करण्याचं स्वातंत्र्यही मोठ्या किमतीसोबत येतं. ‘ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026’ नुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांचे नागरिक सर्वाधिक करही भरतात. या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या स्वीडनसोबत फिनलंड आणि डेन्मार्कसारख्या देशांमध्ये प्रभावी कर 56-57% पर्यंत पोहोचतो. याच करातून तिथे मोफत शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा…

Read More

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात…

Read More

स्वायत्त संस्थांच्या फेलोशिपला मर्यादा:आता प्रत्येक संस्थेतून केवळ 100 विद्यार्थ्यांची निवड होणार, नवे निकष लागू

स्वायत्त संस्थांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. यानुसार, प्रत्येक संस्थेसाठी कमाल १०० विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचा आदेश जारी केला असून, ‘बार्टी’च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. शासनाच्या ताज्या आदेशानुसार, टीआयआरटीआय (आरती), बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या स्वायत्त संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती…

Read More