Headlines

Admin

पैठण येथील शासकीय वस्तुसंग्रहालय कायापालटासाठी 1.75 कोटींची मंजुरी:सातवाहनकालीन वैभवास येणार नवसंजीवनी‎

संत एकनाथ महाराजांची पावन कर्मभूमी, गोदावरीचा पवित्र तीर आणि सातवाहन राजवंशाची ऐतिहासिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवाला आता खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळणार आहे. येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात असलेल्या बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालयाच्या दालनांचे संपूर्ण नूतनीकरण करणे आणि एक अत्याधुनिक नवीन दालन उभारणे या कामासाठी शासनाने १ कोटी ७५ लाख ४५…

Read More

मुकुंदवाडी चौकातील मुख्य रस्त्यावर भरदिवसा तरुणाची लूट:व्हिडिओ व्हायरल, वर्दळीच्या चौकात घडलेल्या घटनेनंतरही गुन्हा नाही, कायदा-सुव्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह

शहरातील वर्दळीच्या मुकुंदवाडी चौकात एका तरुणाला भरदिवसा मारहाण करत लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, भररस्त्यात एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांत कोणताह . शहरातील मुकुंदवाडी चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. याच चौकात एकाने एका तरुणाला रस्त्याच्या कडेला खाली पाडून मारहाण…

Read More

बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे सुमारे 2 दशकांपूर्वी टाटाच्या नॅनो प्रकल्पावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर टाटा समूहाच्या सिंगूरमधील पुनरागमनाबाबत चर्चा तीव्र झाली आहे. राज्याचे उद्योग मंत्री तापस रॉय यांनी सांगितले की, टाटासोबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. टाटा समूह परत येण्यास तयार असेल, तर सरकार तिथे इतर…

Read More

दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘परवाच तर जाऊन आलो:केंद्रात मंत्रिपदाच्या राऊत यांच्या दाव्यावर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, या राजकीय चर्चेला खुद्द फडणवीस आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला. मुख्यमंत्र्यांनी मी परवाच दिल्लीला जाऊन, आलो, मिश्कील टि . फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल आणि त्यांच्या जागी बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा ठाकरे गटाचे…

Read More

80 तासांनी मोशीच्या कचरा ढिगाऱ्यामधून 7 मृतदेह बाहेर:एकूण बळींची संख्या 8 वर, मृतांत छत्रपती संभाजीनगरचा तरुण

पुण्याजवळील मोशी येथील कचरा डेपोत तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ८० तासांनंतर टप्प्याटप्याने शनिवारी ढिगाऱ्याखालून आणखी ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाचाही समावेश आहे. त्यासोबत दुर्घटनेतील एकूण बळींचा आकडा ८ वर पोहोचला. एकाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे आव्हान बचाव दलापुढे आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील मोशी येथे अँटोनी लॉरा रिन्युएबल…

Read More

राजस्थानसह 9 राज्यांत कमी पाऊस:श्रीगंगानगरचे तापमान 42°C, देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब; प्रयागराज – ऋषिकेशमध्ये गंगेच्या पातळीत वाढ

देशाच्या सुमारे 70% भागातून मान्सूनचे ढग नाहीसे झाले आहेत. विशेषतः राजस्थान, दिल्ली-एनसीआर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक येथे पुढील 5 दिवस पावसाची शक्यता कमी आहे. पाऊस थांबल्याने मध्य प्रदेश, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमान वाढले. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, काही भागांत शनिवारी मुसळधार…

Read More

संभाजीनगरात दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा:5.26 कोटी रोख, 4 रायफल्स, 2 पिस्तुले, 6,350 काडतुसे, दागिने असे मोठे घबाड हाती

मिटमिटा परिसरात फार्महाऊसमधून मोठ्या प्रमाणात रोकड व शस्त्रांची निर्यात होणार असल्याची माहिती शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सुरुवातीला काही पोलिसांची टीम कारवाईसाठी गेली होती. यातील महिलेने विरोध दर्शवत ‘बाबाजीने बोला, रूम खोलने का नहीं,’ असे सांगितल्यावर हा बंगला १९९० च्या दशकातील कथित डॉन व कामगार नेते बाबा फर्जन ऊर्फ फरदून अर्देसर दोरडी यांचा असल्याचे उघड…

Read More

"समृद्धी’वर भरधाव ट्रकने जीवरक्षकालाच चिरडले:अपघात करून पळालेला ट्रक 12 तासांत जप्त

समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ११) रात्री साडेबाराच्या सुमारास अपघात घडला. महामार्गावर नादुरुस्त झालेल्या एका कारमधील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी बॅरिकेडिंग करणाऱ्या महामार्ग आपत्कालीन मदत वाहनाचे (आरपीओ) चालक मुन्नालाल प्रजापती (३४) यांना मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकची चाके प्रजापती यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने पायांच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या, तर डोके…

Read More

प्रेमप्रकरणातून वाद:प्रेयसीच्या चुलत्याची कुऱ्हाडीने‎ हत्या; प्रियकरासह चार अटकेत‎, नांदेड शहरातील आसना पूल परिसरात मध्यरात्री खून‎

नांदेड शहर पुन्हा एकदा थरारक हत्याकांडाने हादरले‎आहे. पुतणीच्या प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादाचा‎शेवट थेट खुनात झाला. सांगवीजवळील आसना पूल‎परिसरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत सचिन‎यशवंत काळे (२४, रा. नुरी चौक, नांदेड) या युवकाची‎विनादांड्याच्या कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या‎‎करण्यात आली. या प्रकरणातील‎‎मुख्य आरोपी राजेश दत्ता राजेगोरे‎‎याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना‎‎विमानतळ पोलिस आणि स्थानिक‎‎गुन्हे शाखेच्या पथकाने सहा तासांत‎‎ताब्यात घेतले….

Read More

डिजिटायझेशनमध्ये विदर्भाची बाजी:एसआयआर मोहिमेत मुंबई-पुणे मागे; मराठवाड्यासह विदर्भ पुढे, चंद्रपूर, हिंगोलीमध्ये अव्वलची चुरस

महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेने वेगाचा उत्तरार्ध गाठला असला तरी राज्याच्या प्रशासकीय कामगिरीत कमालीची तफावत समोर आली आहे. १० जुलै २०२६ च्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील ९.७८ कोटी मतदारांच्या या महाअभियानात मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये कोट्यवधींची आणि हजारो बीएलओची “फौज’ दिमतीला असूनही ही महानगरे कासवगतीवर आहेत. याउलट कमी मनुष्यबळ आणि विपरीत परिस्थिती असलेल्या मराठवाड्याने फॉर्म वाटपात आपला डंका…

Read More