60 वर्षांची इमारत:11 उपकेंद्रांचा भार सांभाळणाऱ्या केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, सव्वा लाख नागरिकांच्या आरोग्याचा आधार धोक्यात, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची ६० वर्षांपूर्वीची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून, तब्बल सव्वा लाख लोकसंख्येचा भार वाहणारे हे आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. या आर . इमारतीतील अनेक भागांतील स्लॅबचे काँक्रीट कोसळून छताच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. छताला मोठी भगदाडे पडली असून, पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण इमारत…