Headlines

Admin

टाळ-मृदंगाचा कडकडाट, अन् भगव्या पताकांचा थाट:निघोजमधून रामदास बाबा दुसाणे माऊलींच्या दिंडीचे प्रस्थान‎

वारकरी संप्रदायाचा जयघोष करत आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरत निघोज येथील श्रद्धास्थान असलेल्या वैकुंठवासी रामदास बाबा महाराज दुसाणे पायी दिंडी सोहळ्याने पंढरपूरकडे कूच केली. खांद्यावर भगव्या पताका घेऊन भजनाच्या सुरात नाचणारे शेकडो वारकरी आणि माता-भगिनींमुळे संपूर्ण निघोज नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. दिंडीच्या प्रस्थानानिमित्त सर्वप्रथम रामदास बाबा दुसाणे महाराज पर्णकुटीत दिंडी प्रमुख भाऊसाहेब कोल्हे मामा व…

Read More

फुटपाथ गायब, पादचारी रस्त्यावर, ग्राहक पंचायत अतिक्रमणांविरोधात आक्रमक:मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, नागरीकरण वाढले, सुविधा घटल्या‎

शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे फुटपाथ आणि पादचारी मार्गांवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून नागरिकांचे संविधानिक अधिकार अबाधित ठेवावेत, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र अकोले तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १९ जून २०२६ च्या आद . अकोले शहराचे नागरीकरण वेगाने वाढत असून अगस्ती सहकारी साखर कारखाना, मुख्य बाजारपेठ आणि शाळा-महाविद्यालयांमु ळे कोल्हार-घोटी रस्त्यासह इतर प्रमुख मार्गांवर…

Read More

पैस खांबाची सावली, माऊलींचे रूप; ‘ज्ञानेश्वरी घाटा’ने पालटले रूपडे:यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार; टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा‎

संत परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेवासा-सोनई परिसरातील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या मुख्य मार्गावरील ‘इमामपूर घाटा’चे आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि हजारो वारकऱ्यांच्या अथांग . नेवासा भूमीतून पंढरपूरकडे कूच करणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि भक्तीचा हुरूप वाढावा, यासाठी या घाटाचा कायापालट करण्यात आला आहे. घाटाच्या पायथ्याशी संत…

Read More

आयुष रुग्णालयामध्ये विविध औषधी वनस्पतींची लागवड:दिव्य मराठी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे ग्रीन सिटी मोहिमेचा उपक्रम‎

जिल्हा आयुष रुग्णालयाच्या आवारात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिम आणि दिव्य मराठीच्या “एक वृक्ष एक जीवन’ मोहिमेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत रुग्णालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या औषधी आणि उपयुक्त वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य सविता मोरे, नगरसेवक दत्ता गाडळकर, वृक्षमित्र अजित कटारिया,…

Read More

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याने हॉटेल मालकाचा श्रीरामपूरमध्ये केला खून

श्रीरामपूर जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नेवासे रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मीनारायण पॅलेस येथे शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. आकाश चंद्रशेखर दुबैया (वय ३४) असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे. या हल्ल्यात पुण्‍यावरून नुकतेच आलेले आकाशाचे वडील आणि भाऊ कुणाल वाचवण्यासाठी धावले असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात…

Read More

आमिर खान सिलक्यारा बोगदा दुर्घटनेवर बनवणार चित्रपट:कबीर खान दिग्दर्शक, ऑस्ट्रेलियात लिहिली स्क्रिप्ट; 17 दिवस अडकले होते 41 मजूर

आमिर खानच्या नवीन चित्रपटाची ‘सिलक्यारा 41’ स्क्रिप्ट ऑस्ट्रेलियात लिहिली गेली आहे. आमिर खानने एक दिवसापूर्वी 2023 मध्ये उत्तरकाशीच्या सिलक्यारा-बडकोट बोगद्यात 17 दिवस अडकलेल्या 41 मजुरांच्या बचाव कार्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहेत. सुरुवातीचे प्री-प्रोडक्शनचे काम ऑस्ट्रेलियात होईल. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शन्स, ऑस्ट्रेलियाची माइंड ब्लोइंग फिल्म्स आणि कबीर…

Read More

15 किलोमीटर लांब वारकऱ्यांची रांग; 60 हजारांहून अधिक वैष्णवांचा मेळा:पिंपळगाव माळवी ते अहिल्यानगर शहरापर्यंत पर्यंत भक्तिमय वातावरण‎

मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच क्षणभर आपण अहिल्यानगरात नसून थेट पंढरपुरात पोहोचलो आहोत, असा भास होत होता. चहुबाजूंनी फडकणाऱ्या भगव्या पताका, ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलाच्या अखंड गजरात मार्गक्रमण करणारे हजारो वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, गळ्यात टाळ आणि चेहऱ्यावर भक्तिभाव… संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीच्या आगमनाने शनिवारी सायंकाळी मार्केट यार्ड परिसर अक्षरशः मिनी पंढरपूर…

Read More

अपघातांची संख्या वाढली:लाडसावंगी ते करमाड रस्त्याची दुरवस्था‎, प्रशासनाने लक्ष देण्याची होतेय मागणी

लाडसावंगी ते करमाड रस्ता सध्या पूर्णपणे उखडला असून, या रस्त्यावरील जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे पाच दिवसांपूर्वी दूधडजवळ दीपक सोमनाथ काळे या तरुण प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, निष्पाप नागरिकांचा बळी घेणारे प्रशासन अजून किती नागरिकांचे जीव घेणार? असा सवाल वाहनधारकांकडून विचारला जात आहे. हा रस्ता केवळ स्थानिक…

Read More

प्रशासनाला अल्टिमेटम:रेल्वे प्रकल्प रद्द केल्यास आमरण उपोषण करणार, संगमनेरात देवगाव रेल्वे कृती समिती आक्रमक‎

केंद्र व राज्य सरकारने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प स्थगित केल्याच्या निषेधार्थ देवगाव ग्रामस्थांच्या वतीने संगमनेर बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण शनिवारी उत्स्फूर्त वातावरणात पार पडले. या आंदोलनाला देवगावसह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, युवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. रेल्वे प्रकल्प पूर्ववत सुरू व्हावा यासाठी आता…

Read More

पंजाबी गायिका जस्मिनने केला एंगेजमेंटचा खुलासा:तरुणाला कॉन्सर्टमध्ये स्टेजवर बोलावून म्हणाली – हा माझा माणूस; धावत जात मिठी मारली

पंजाबी गायिका जस्मिन सँडलसच्या ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’ च्या पहिल्या कॉन्सर्टदरम्यान एक असा क्षण समोर आला, ज्याने हजारो चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. थेट सादरीकरण सुरू असताना जस्मिनने आपले नाते सार्वजनिक करत स्टेजवर एका व्यक्तीला बोलावले आणि सांगितले की तोच तिचा होणारा नवरा आहे. कॉन्सर्ट पूर्ण रंगात होता आणि चाहते जस्मिनच्या गाण्यांवर नाचत होते. याचवेळी…

Read More