Headlines

Admin

कमी मानधन, कामाचा ताण; आशा सेविकांचा तीव्र इशारा:मनपाच्या आरोग्य केंद्रासमोर केली जोरदार निदर्शने‎

देशभरातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळण्याची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर निदर्शने केली. यावेळी शासनाच्या सदोष धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर व इतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन सादर…

Read More

केवळ झाडे लावणे, ती जगवणे हीच खरी सेवा:आलेगावात होणार 70 वडांचा वाढदिवस‎, विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली ‎पर्यावरण रक्षणाची शपथ‎

. दैनिक दिव्य मराठी ‘एक वृक्ष एक जीवन’ अभियान राबवत आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये, बगीचे, शहर व गावातील मोकळ्या जागांमध्ये नागरिक, पर्यावरणप्रेमी, शाळा, महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवड करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते वृक्षलागवड करुन करण्यात आला. ‘दिव्य मराठी’च्या या अभियानात…

Read More

विद्यार्थी दिन साजरा‎:विद्यार्थी नेतृत्व घडवण्यात अभाविपचे योगदान, ॲड. गिरीश गोखले यांचे प्रतिपादन

विद्यार्थी हा समाजाचा व राष्ट्राचा भावी कणा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गत सात दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण विकसित करण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन अभाविपचे कार्यकर्ते तथा नगरसेवक ॲड. गिरीश…

Read More

परिचारिकांचे ‘काळ्या फिती’ लावून आंदोलन‎:सुरक्षा व्यवस्था बळकट करावी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम हवी

अकोला डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला परिचारिका व डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून (ता.१०) राज्यव्यापी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आल्यानंतर शनिवारीही (ता.११) सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू ठेवले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या…

Read More

नरोत्तम मिश्रांचे तिकीट मोहन यादवांनी कापले का:फॉर्म खरेदी केला, प्रचारात गुंतले होते; मग अचानक काय झाले, आता पुढे काय?

एमपीचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दतिया पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर लगेचच ते प्रचारातही उतरले होते. पण 10 जुलै रोजी भाजपने त्यांचे तिकीटच कापले. आशुतोष तिवारी यांना उमेदवार बनवण्यात आले. आता नरोत्तम यांचे समर्थक गोंधळ घालत आहेत. दतियात कलम 163 लागू आहे. अखेरनरोत्तम मिश्रा यांचे तिकीट का कापले गेले आणि नवीन उमेदवार…

Read More

अकोल्यात पावसाची प्रतीक्षा कायम:दहा दिवसांनंतरच आगमनाचा अंदाज, गतवर्षीच्या तुलनेत 46 मिमी कमी पाऊस; जिल्ह्यातील धरणे अजुनही तहानलेली‎

अकोला सध्या अकोला जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडला असून, पुढील आठ ते दहा दिवस दमदार पावसाची शक्यता कमी आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन””मुळे (चक्रीवादळ सदृश स्थिती) मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलली आहे. हे बाष्पयुक्त वारे भारताकडे येण्याऐवजी दक्षिणेकडे म्हणजेच श्रीलंकेकडे वळले आहेत. तसेच, गुजरात, राजस्थानमधील अधिक तापमानामुळे काही वारे…

Read More

अल्प दरात शिलाई मशीन; एक महिन्याचे प्रशिक्षण:स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन; तंत्रशुद्ध मार्गदर्शन‎

शहरातील जुने शहर परिसरात ‘वैष्णवी शिवण क्लास’ च्या वतीने स्थानिक महिलांसाठी अल्प दरात शिलाई मशीन वाटप आणि एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने शीतल गिरी यांनी या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जुने शहर परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात…

Read More

अवैध वाहतुक कारवाईत‎‎१८ हजाराचा दंड वसूल‎, खामगावचे आगार व्यवस्थापक पवन टाले ॲक्शन मोडवर

खामगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आगार व्यवस्थापक पवन टकले ॲक्शन मोडवर आले असून, उपप्रादेशिक परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने धडक मोहीम राबवत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांना एसटी सेवेकडे वळवणे आणि महामंडळाच्या उत्पन्नात…

Read More

30 सेकंदात गर्लफ्रेंडला 195 वेळा किस:किडनी चोरीच्या भीतीने टावरवर चढला माणूस; रूममेटने सुई-दोऱ्याने शिवले ओठ

ब्राझीलमधील एका जोडप्याने 30 सेकंदात 195 वेळा चुंबन घेऊन जागतिक विक्रम केला. तर, मध्य प्रदेशात किडनी चोर टोळीच्या अफवेने घाबरलेला एक वृद्ध 230 फूट उंच टॉवरवर चढला. दुसरीकडे, जपानमध्ये भांडणानंतर एका महिलेने तिच्या रूममेटचे ओठ सुई-दोऱ्याने शिवले. तेलंगणातील एका व्यक्तीने गुगलवरून मित्राचे घर शोधून 25 वर्षांपूर्वीचे कर्ज फेडले. तर, एका अमेरिकन व्यक्तीने 125 टी-शर्ट घालून…

Read More

युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह:अयोध्या राम मंदिरातील अपहारप्रकरणी एल्गार‎

प्रभू श्रीरामांच्या पवित्र अयोध्यानगरीतील राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित अपहाराच्या निषेधार्थ माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवारी युवक काँग्रेसने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. कधीकाळी रामभक्तीचे प्रमाणपत्र देणारेच आज रावण म्हणून पुढे आले, असा घणाघात यावेळी डॉ. देशमुख यांनी केला. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिर येथे हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी…

Read More