Headlines

Admin

नरोत्तम मिश्रांचे तिकीट मोहन यादवांनी कापले का:फॉर्म खरेदी केला, प्रचारात गुंतले होते; मग अचानक काय झाले, आता पुढे काय?

एमपीचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दतिया पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर लगेचच ते प्रचारातही उतरले होते. पण 10 जुलै रोजी भाजपने त्यांचे तिकीटच कापले. आशुतोष तिवारी यांना उमेदवार बनवण्यात आले. आता नरोत्तम यांचे समर्थक गोंधळ घालत आहेत. दतियात कलम 163 लागू आहे. अखेरनरोत्तम मिश्रा यांचे तिकीट का कापले गेले आणि नवीन उमेदवार…

Read More

अकोल्यात पावसाची प्रतीक्षा कायम:दहा दिवसांनंतरच आगमनाचा अंदाज, गतवर्षीच्या तुलनेत 46 मिमी कमी पाऊस; जिल्ह्यातील धरणे अजुनही तहानलेली‎

अकोला सध्या अकोला जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडला असून, पुढील आठ ते दहा दिवस दमदार पावसाची शक्यता कमी आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन””मुळे (चक्रीवादळ सदृश स्थिती) मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलली आहे. हे बाष्पयुक्त वारे भारताकडे येण्याऐवजी दक्षिणेकडे म्हणजेच श्रीलंकेकडे वळले आहेत. तसेच, गुजरात, राजस्थानमधील अधिक तापमानामुळे काही वारे…

Read More

अल्प दरात शिलाई मशीन; एक महिन्याचे प्रशिक्षण:स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन; तंत्रशुद्ध मार्गदर्शन‎

शहरातील जुने शहर परिसरात ‘वैष्णवी शिवण क्लास’ च्या वतीने स्थानिक महिलांसाठी अल्प दरात शिलाई मशीन वाटप आणि एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने शीतल गिरी यांनी या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जुने शहर परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात…

Read More

अवैध वाहतुक कारवाईत‎‎१८ हजाराचा दंड वसूल‎, खामगावचे आगार व्यवस्थापक पवन टाले ॲक्शन मोडवर

खामगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आगार व्यवस्थापक पवन टकले ॲक्शन मोडवर आले असून, उपप्रादेशिक परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने धडक मोहीम राबवत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांना एसटी सेवेकडे वळवणे आणि महामंडळाच्या उत्पन्नात…

Read More

30 सेकंदात गर्लफ्रेंडला 195 वेळा किस:किडनी चोरीच्या भीतीने टावरवर चढला माणूस; रूममेटने सुई-दोऱ्याने शिवले ओठ

ब्राझीलमधील एका जोडप्याने 30 सेकंदात 195 वेळा चुंबन घेऊन जागतिक विक्रम केला. तर, मध्य प्रदेशात किडनी चोर टोळीच्या अफवेने घाबरलेला एक वृद्ध 230 फूट उंच टॉवरवर चढला. दुसरीकडे, जपानमध्ये भांडणानंतर एका महिलेने तिच्या रूममेटचे ओठ सुई-दोऱ्याने शिवले. तेलंगणातील एका व्यक्तीने गुगलवरून मित्राचे घर शोधून 25 वर्षांपूर्वीचे कर्ज फेडले. तर, एका अमेरिकन व्यक्तीने 125 टी-शर्ट घालून…

Read More

युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह:अयोध्या राम मंदिरातील अपहारप्रकरणी एल्गार‎

प्रभू श्रीरामांच्या पवित्र अयोध्यानगरीतील राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित अपहाराच्या निषेधार्थ माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवारी युवक काँग्रेसने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. कधीकाळी रामभक्तीचे प्रमाणपत्र देणारेच आज रावण म्हणून पुढे आले, असा घणाघात यावेळी डॉ. देशमुख यांनी केला. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिर येथे हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी…

Read More

‘हरित अमरावती’साठी वृक्षारोपण, ‘एक वृक्ष-एक जीवन’चा संकल्प:बुद्ध जयंती उत्सव समिती, सुखाय फाउंडेशनचा पुढाकार

पर्यावरण संवर्धन आणि ‘हरित अमरावती’च्या निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्याच्या उद्देशाने बुद्ध जयंती उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता दुभाजकाच्या कॅरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वाढते तापमान, झाडांची होणारी कत्तल, शहरीकरणामुळे कमी होत चाललेली हरित संपदा आणि पर्यावरणाचा बिघडलेला समतोल याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी…

Read More

तरुणांना रोजगारासाठी एमआयडीसी देऊ:बाजार समिती उभी केली त्यांचा आदर राखा, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला समाचार‎

अक्कलकोट परिसराच्या विकासात व दुधनी बाजार समितीच्या निर्मितीत म्हेत्रे परिवाराचे मोठे योगदान आहे. ज्यांनी बाजार समिती उभी केली, त्यांचा आदर राखलाच पाहिजे, अशा शब्दात सुनावत शिवसेना आणि महायुती सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी दुधनी येथे लवकरच एमआयडीसी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री सामंत…

Read More

ॲप्रोच चॅनल तयार करण्यासाठी धरणात ब्लास्टिंग करावे लागणार:रोज 5 कोटी लिटर पाणी वाढले; मात्र ॲप्रोच चॅनलचे काम 4 महिने रखडले

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि कंत्राटदार यांच्यातील वादामुळे १६ दिवसांपासून बंद असलेला नवीन पाणीपुरवठा अखेर सुरू झाला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने, मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिलेल्या ताकिदीनंत . नक्षत्रवाडी पंपहाऊसला पावसामुळे लागलेली गळती आणि मुख्य जलवाहिनीवरील ५३ नादुरुस्त व्हॉल्व्हचे कारण देत एमजेपीने २४ जूनपासून जायकवाडीतून पंपिंग बंद ठेवले…

Read More

वाखरीत 7 लाख भाविकांसाठी पालखी तळ:शौचालय परिसरात 2500 चौ. फुटांचे काँक्रीटीकरण, तर विहिरीभोवती ‎संरक्षण खांब‎

पालखी मार्गावरील अखेरच्या मुक्कामाचे ठिकाण असलेल्या वाखरी येथील पालखी तळावरील भाविकांच्या स्वागताची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नव्याने रस्त्यांचे काँक्रीटीकरण, आवश्यक तेथे मुरुमीकरण, गवत, झुडुपे काढून सफाई करण्याची कामे सुरू आहेत. येत्या ८ दिवसांत संपूर्ण पालखी तळ सुसज्ज करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. वाखरी पालखी तळावर राज्यभरातून येणाऱ्या अनेक पालखी सोहळ्यांचा मुक्काम असतो….

Read More