Headlines

Admin

शेतकऱ्यांसाठी नवे ॲप:खत खरेदी घरबसल्या, आयएफएमएस-ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘फर्टीलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम’ (FSAS) नावाचे नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या खतांचे बुकिंग करता येणार आहे, ज्यामुळे त्यांची गैरसोय टळणार आहे. राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत, आयएफएमएस (IFMS) आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) या प्रणालींचे एकत्रीकरण करून हे ॲप तयार करण्यात आले आहे….

Read More

नीट पेपरफुटीविरोधात ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी

सध्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार आणि विशेषतः नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली….

Read More

अमरावती जीएमसी हस्तांतरणाचा तिढा कायम:तिसरे वर्ष अडचणीत, डीनला तिन्ही रुग्णालये हवीत; यंत्रणा म्हणते गरजेनुसार घ्या

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक वाटचालीत पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) अद्यापही पूर्णपणे जीएमसी प्रशासनाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे तिसरे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी), वैद्यकीय शिक्षण परिषद आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या दिरंगाईची गंभीर दखल घेतली आहे. इर्विनचा ताबा न घेतल्यामुळे जीएमसीतील…

Read More

जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला:अमरावती आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

अमरावती शहरात जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जनगणना सुरू असताना ही घटना घडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावती महानगरपालिकेकडून संबंधित कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जनगणना कर्मचारी स्वस्तिक नगर परिसरात घरोघरी माहिती संकलित करत होते. त्यावेळी एका घरात एक वृद्ध महिला गंभीर अवस्थेत आढळली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रसंगावधान…

Read More

मणीबाई हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी 'विकसित भारत बिल्डथॉन'मध्ये प्रथम क्रमांक पटकावला:अटल टिंकरिंग लॅब ठरली उपयुक्त, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी ‘केंद्र शासन पुरस्कृत विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या जीविका नलगे आणि रिया कांबे या विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले. त्यांनी कठोर मेहनत, नावीन्यपूर्ण विचार आणि जिद्दीच्या जोरावर तंत्रज्ञान…

Read More

राष्ट्र विकासासाठी त्याग करणारा शेतकरी आजही वंचित:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनी सुरेखाताई ठाकरे यांचे मत

राष्ट्र विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शेतकरी हा समाजातील एकमेव घटक आहे, परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी आजही आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले. त्या अमरावती येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या कार्यक्रमाला…

Read More

वाकीतील महिला बचत गट 'फार्मर कप 2026' साठी सज्ज:सेंद्रिय शेती आणि गावाच्या विकासासाठी पुढाकार

भातकुली तालुक्यातील वाकी येथील महिलांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेती विकास, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. कृषी यंत्रणेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वाकी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गावात नुकत्याच आयोजित मार्गदर्शन शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून…

Read More

पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार!:19 वर्षीय मद्यधुंद तरुणाची भरधाव कार गरवारे पुलावरून खाली कोसळली, गुन्हा दाखल

पुण्यात पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची धक्कादायक घटना घडली असून, दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या अथर्व अमित जैन (वय 19) या तरुणाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या कारने थेट गरवारे पुलाचे रेलिंग तोडून खाली कोसळल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या गंभीर निष्काळजीपणाबद्दल डेक्कन पोलिस ठाण्यात आरोपी तरुणावर…

Read More

युवक काँग्रेसची 'आवाज महाराष्ट्राचा' मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका

अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या आंदोलनात्मक मोहिमेची घोषणा केली. शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी प्रभाग पद्धतीची स्वच्छतेची कंत्राटे रद्द करून नियम व…

Read More

एनडीएच्या 150 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनात 'सारंग'चे हवाई प्रात्यक्षिक:महिला कॅडेट्सच्या तिसऱ्या तुकडीच्या पदवीदान सोहळ्यानिमित्त भव्य प्रदर्शन

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) च्या १५० व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त भारतीय हवाई दलाचे ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रदर्शन पथक हवाई प्रात्यक्षिक सादर करणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एनडीएच्या महिला कॅडेट्सची तिसरी तुकडी पदवीधर होत आहे. सशस्त्र दलांमध्ये लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. एनडीए ही…

Read More