Headlines

Admin

नागपूर पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई:हॉटेल मालक अंमली पदार्थांचा किंगपिन, 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त

नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. उमरेड येथे दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करत पोलिसांनी थेट झारखंड राज्यात धाड टाकली. या कारवाईत टोळीचा म्होरक्या असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू आणि २३ लाख ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह…

Read More

गुंदवली-डीएन नगर मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी:बोरीवलीतील समस्यांवर आमदार संजय उपाध्याय यांची BMC आयुक्तांशी भेट

बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी बुधवारी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन बोरीवली परिसरातील नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक सुविधा आणि रखडलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी मेट्रो सेवा, अतिक्रमण, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण आणि अवैध गतिविधींसह अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. बीएमसी आयुक्तांनी विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. गुंदवली-डीएन नगर…

Read More

अर्थखाते मागूनही मिळत नसल्याची सुनेत्रा पवारांची खंत:CM देवेंद्र फडणवीस म्हणाले- माझ्यापर्यंत त्यांची कोणतीही नाराजी आलेली नाही

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आले आहे. सध्या पक्षवाढीसह स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र, उपमुख्यमंत्रिपद मिळूनही अजितदादांकडे असलेले महत्त्वाचे अर्थखाते अद्याप सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. अर्थखाते न मिळाल्यावरून सुनेत्रा पवार…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी शिंदेसेनेचा दावा कायम:विप्लव बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी महायुतीकडून शिंदेसेनेने आपला दावा कायम ठेवला असून महायुतीकडून पुन्हा एकदा माजी आमदार विप्लव बाजोरीया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्‍वसनीय सुत्रांनी सांगितले. तर खासदार श्रीकांत शिंदे गुरुवारी ता. ३० हिंगोलीत येणार असून यावेळी ते काही पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. परभणी- हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीकडून शिंदेसेनेकडे आहे. या विधान परिषदेसाठी…

Read More

तुरुंगातूनही आंदेकर टोळीची दहशत!:अहिल्यानगरमध्ये मोठा कट उधळला, शस्त्रास्त्रांसह 5 सराईत गजाआड; लाखोंचा मुद्देमालही जप्त

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हत्या आणि हत्येच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे करणारी आंदेकर टोळी, त्यांचे प्रमुख तुरुंगात असतानाही शहरासह शेजारील जिल्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपासातून उघड झाले आहे. कारागृहाच्या भिंतींआड बसूनही पूर्ववैमनस्यातून या गुन्हेगारी कारवायांची सूत्रे हलवली जात असून, नुकतीच अहिल्यानगरमध्येही याची प्रचिती आली आहे. जिथे पोलिसांनी कारवाई करत आंदेकर टोळीतील पाच जणांना बेड्या…

Read More

सतेज पाटील यांच्या बदनामीकारक बॅनर्समुळे काँग्रेस आक्रमक:पुण्यात पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी

पुणे शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर असलेले बेकायदेशीर बॅनर्स लावण्यात आले आहेत. पुणे शहर काँग्रेसने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला असून, हा सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई: 104 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू:1.73 लाख नागरिकांना दिलासा; 5.5 कोटींहून अधिक निधी मंजूर

पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १११ गावे आणि ४२६ वाड्यांना एकूण १०४ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला…

Read More

राज्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम-9 ची जय्यत तयारी:1.19 कोटी लस मात्रा उपलब्ध होणार, 20 नवीन कोल्ड-रूम उभारल्या

राज्यात लाळखुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी-९ साठी पशुसंवर्धन विभागाने तयारी सुरू केली आहे. मे अखेरपर्यंत राज्याला १ कोटी १९ लाख लस मात्रा उपलब्ध होणार आहेत. लसींच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. या लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्याने २० ‘वॉक-इन कोल्ड-रूम’ उभारण्यात आल्या आहेत….

Read More

कांदा प्रश्नावर 10 दिवसांत तोडगा निघणार:अमित शहांसोबत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवारांची माहिती; निर्यातबंदीही उठणार!

महाविकास आघाडीकडून तसेच इतर विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासंदर्भात सत्ताधाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन केले होते. महाविकास आघाडीकडून काल (दि. 26 मे) नाशिक येथे रस्ता जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या…

Read More

SC ने म्हटले- ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर 28% GST योग्य:राज्यांना मनी गेम्सवर बंदी घालण्याचा हक्क मिळाला; कर वसूलल्यास अनेक कंपन्या बंद होतील

सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना जारी केलेले वस्तू आणि सेवा कर (GST) च्या कारणे दाखवा (शो-कॉज) नोटिसांना पूर्णपणे वैध ठरवले आहे. न्यायालयाने म्हटले की गेमिंग प्लॅटफॉर्मवर जमा केलेल्या एकूण रकमेवर (फुल व्हॅल्यू ऑफ डिपॉझिट) 28% कर आकारणे घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयाने डेल्टा कॉर्प आणि इतर गेमिंग कंपन्यांच्या त्या याचिका फेटाळून लावल्या, ज्यात मागील…

Read More