Headlines

Admin

अमित ठाकरेंनी 'मातोश्री'पासून जरा सांभाळून राहावे:आदित्य निवडून आले, पण तुम्हाला पाडले; रामदास कदमांचा सावधगिरीचा सल्ला

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. अमितजींना माझ्या खूप-खूप शुभेच्छा, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे, असा खोचक सल्ला रामदास कदम यांनी दिला. या राजकीय टोलेबाजीसोबतच, सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या…

Read More

पुण्यात 6 बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना अटक:बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई, तपास सुरू

पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पुणे पोलिसांनी अत्यंत धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी रात्री संपूर्ण पुणे शहरात राबवण्यात आलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’ दरम्यान ६ बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवार पेठेतील ‘सागर बिल्डिंग’वर छापा टाकून ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश…

Read More

घरफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद:18 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त, फरासखाना पोलिसांची कारवाई

कसबा पेठेत घरफोडी करून पसार झालेल्या दोन सराईत चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (वय ३३, रा. वेताळनगर, चिंचवड) आणि रामा उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय ३३, रा….

Read More

मोदींनी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला कडेवर घेतले:टेबलवर उभे करून लाड केले, मुलीला वही दिली; राम मोहन नायडू कुटुंबासह पोहोचले होते

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी शनिवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. नायडू कुटुंबीयांसोबत दिल्लीतील सेवा तीर्थ भवनात पोहोचले होते. भेटीदरम्यान पंतप्रधानांनी नायडूंच्या दोन्ही मुलांना लाड केले. पंतप्रधानांनी मुलाला कडेवर घेतले आणि नंतर टेबलावर उभे केले. यानंतर नायडूंची मुलगी मोदींजवळ पोहोचली, तेव्हा पंतप्रधानांनी तिच्याकडून एक वही घेतली आणि त्यात काहीतरी लिहून तिच्या…

Read More

राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार:"मुंगेरीलाल के हसीन सपने" म्हणत केली खिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार एका वर्षात कोसळेल, या केलेल्या दाव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या मालिकेसारखे केवळ एक दिवास्वप्न असून, त्यात वास्तवाचा लवलेशही नाही, असे फडणवीस रविवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी…

Read More

पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकाला अटक:1.76 लाखांचा मुद्देमाल जप्त, साथीदारांचा शोध सुरू

पुण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन विक्री प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. शंकरशेठ रस्ता परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कानिफनाथ उर्फ कानू विष्णू नायडू (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटार, मोबाइल आणि…

Read More

मानसिक आजार मोकळेपणाने स्वीकारा:आयरा खानचे आवाहन, स्वतःच्या संघर्षाचा अनुभव मांडला

पुण्यात जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार भवन येथे झालेल्या या कलाविष्कारात स्किझोफ्रेनियासारख्या तीव्र मानसिक आजाराशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या आयरा खान यांनी मानसिक आजार मोकळेपणाने स्वीकारण्याचे आवाहन केले. अगास्तू फाउंडेशनच्या संस्थापक, थिएटर दिग्दर्शक आणि मानसिक स्वास्थ्य कार्यकर्त्या…

Read More

गुजरातमध्ये बँकेतून 8.70 कोटी चोरणारा कर्मचारी अटकेत:कचरा असल्याचे सांगून 9 बॉक्समध्ये भरून घेऊन गेला होता, 2 कोटींचे घर, 1 कोटींचे दुकान खरेदी केले

अहमदाबादमधील आरबीआयच्या करन्सी चेस्ट बँकेतून ८.७० कोटी रुपये चोरणाऱ्या कस्टोडियनला पोलिसांनी अटक केली आहे. १३ जानेवारीच्या रात्री ९:१२ वाजताचा बँकेचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. यामध्ये कस्टोडियन आणि त्याचे दोन साथीदार बॉक्समध्ये भरून पैसे घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. तपासात समोर आले आहे की,…

Read More

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी अटकेत:मुंढवा पुलावरून उडी मारलेल्या तरुणीच्या प्रेमप्रकरणातून कारवाई

प्रेमप्रकरणातून एका उच्चशिक्षित तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणीने मुंढवा पुलावरून मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी चैतन्य संजय कानडे (वय २३, रा. वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. तरुणीचा भाऊ निखील चारुदत्त अष्टेकर (वय २२) याने खराडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे….

Read More

यवतमाळमध्ये उन्हाचा कहर!:हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी; 48 तासांत 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रचंड उष्णलहरींमुळे गेल्या 48 तासांत तब्बल आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचेच बळी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात…

Read More