Headlines

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी अटकेत:मुंढवा पुलावरून उडी मारलेल्या तरुणीच्या प्रेमप्रकरणातून कारवाई




प्रेमप्रकरणातून एका उच्चशिक्षित तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणीने मुंढवा पुलावरून मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी चैतन्य संजय कानडे (वय २३, रा. वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. तरुणीचा भाऊ निखील चारुदत्त अष्टेकर (वय २२) याने खराडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखीलची बहीण निकिता (वय २३, रा. खराडी, मूळ रा. सोलापूर) हिने ६ मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंढवा येथील पुलावरून नदीपात्रात उडी मारली होती. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. निकिता एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत होती. आरोपी चैतन्य कानडे हा त्यांचा नातेवाईक असून, त्याचे वडगाव शेरी येथे पादत्राणांचे दुकान आहे. निकिता आणि चैतन्य यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, त्यानंतर चैतन्यने निकिताला त्रास देण्यास सुरुवात केली. चैतन्यच्या त्रासाला कंटाळूनच निकिताने आत्महत्या केल्याचे तिच्या भावाने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वसतिगृहातून लॅपटॉप चोरी बालेवाडीतील एका खासगी वसतिगृहातून (पीजी) चोरट्यांनी २ लॅपटॉप, मनगटी घड्याळ, मोबाइल असा मु्द्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा बालेवाडीतील झोलो पीजी या खासगी वसतिगृहात राहायला आहे. चोरट्यांनी वसतिगृहातून २ लॅपटॉप, एक मनगटी घड्याळ, लॅपटॉप बॅग, मोबाइल , पेनड्राईव्ह असा मुद्देमाल चोरुन नेला. पोलीस हवालदार एस निकाळजे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *