Headlines

Admin

विधान परिषद निवडणूक: आजपासून उमेदवारी अर्ज दाखल:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी रणधुमाळी सुरू

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी आज, सोमवार, २५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सकाळी ११ ते…

Read More

वायएसपीच्या दाव्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या:काँग्रेसकडे वासंती मंगरोळे, हर्षजीत देशमुख यांची उमेदवारी मागणी

अमरावती: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने (वायएसपी) दावा केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडे दोन इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. सूत्रांनुसार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वासंती मंगरोळे यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, नागपूरचे उद्योजक हर्षजीत देशमुख यांनी थेट…

Read More

अचलपूरमध्ये तीव्र पाणीटंचाई, काही भागांना टँकरने पाणीपुरवठा:चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे मेळघाटच्या पायथ्याशी समस्या

अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिकेतर्फे टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब प्रचंड कमी झाला आहे. यामुळे अचलपूर शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव सहन करणे सहनशीलतेचा पराकोट:हर्षवर्धन सपकाळ यांचे फुले, गांधी, नेहरू विचारमंचच्या व्याख्यानात आवाहन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, एफस्टिन फाईलसारख्या विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव असूनही आपण त्यांना सहन करतो, ही आपल्या सहनशीलतेची पराकाष्ठा आहे. आता रस्त्यावर उतरून सविनय सत्याग्रह करण्याशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. त्यांनी ‘दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी’ तयार राहण्याचे आवाहन केले. सपकाळ रविवारी (२४ मे) पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंचने…

Read More

अमरावती रुग्णालयासमोर कचऱ्याचे ढिगारे:एसटी बसस्थानक परिसरात अस्वच्छतेमुळे आरोग्याला धोका

अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे महापालिका प्रशासनाचे दावे जमिनीवरील परिस्थितीशी पूर्णपणे विसंगत आहेत. शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या एसटी बसस्थानकाच्या भिंतीला लागून असलेल्या एका खाजगी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. ज्या संवेदनशील ठिकाणी सर्वाधिक स्वच्छतेची गरज आहे, त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बुरखा फाटला आहे. एसटी…

Read More

बाभळीत पाणी समस्या: स्वतंत्र जलकुंभाची मागणी:राकाँ. शहराध्यक्ष अमोल गहरवार यांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरणाला निवेदन

दर्यापूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील बाभळी परिसरात अनेक महिन्यांपासून, तर काही भागांमध्ये दोन वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित आहे. या गंभीर पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमोल अशोकसिंह गहरवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) उपकार्यकारी अभियंता विजय शेंडे यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. नागरिकांना उन्हाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे…

Read More

गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू:माझ्या लेकाची चिरफाड करू नका.., पालकांचा आक्रोश

गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू पावल्याची घटना आज दिनांक 24 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील गणेश संतोष डोंगरे वय 13 वर्ष , रणवीर यशवंत शिंगाडे वय 14 वर्षे आणि राज अविनाश हनवते वय 11 वर्ष हे तिघे मित्र नेहमीप्रमाणे आजही गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. नगीना…

Read More

24 वर्षीय युवकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू:शेतातील वीज दुरुस्त करताना घडली घटना

चांदूर रेल्वे येथील सावंगी संगम परिसरात शेतातील वीजपुरवठा दुरुस्त करत असताना वीजेचा धक्का लागून २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अंकुश श्रावणजी नेवारे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करत असे. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात सुमारे दोन एकर शेती असून,…

Read More

एमआयडीसीत भूखंडधारकांना वर्षभरात 40% बांधकाम बंधनकारक:अट न पाळल्यास भूखंड परत घेण्याचा प्रशासनाचा निर्णय

एमआयडीसीमध्ये भूखंड घेणाऱ्या उद्योजकांना आता एका वर्षाच्या आत किमान ४० टक्के बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असेल. तसे न केल्यास त्यांना भूखंड परत करण्याची तयारी ठेवावी लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला आहे. राज्याचे प्रधान सचिव (उद्योग) आणि राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत…

Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात नांदगाव पेठ प्रथम:ग्रामविकास, डिजिटल प्रशासन, लोकाभिमुख उपक्रम ठरले यशाचे केंद्रबिंदू

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नांदगाव पेठ ग्रामपंचायतीने अमरावती तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामविकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख उपक्रम यावर भर देत ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले. गावातील विविध विकासकामे, स्वच्छ व सुंदर परिसर, पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि ग्रामविकासाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली. या कामगिरीबद्दल ग्रामपंचायत प्रशासन,…

Read More