पूर्ण बहुमत मिळविण्यासाठी शिवसैनिकांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचावे:खासदार शिंदे यांच्या नांदगाव, येवला येथील पदाधिकाऱ्यांना सूचना
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करावे, पक्षाचा विस्तार करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार संपर्क अभियान राबवा. अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या. शिवसंवाद दौऱ्यात खासदार शिंदे यांनी नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले…