![]()
सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील दोन वेगवेगळ्या दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दोन्ही घटनांमध्ये ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पहिली घटना अण्णा भाऊ साठे चौकात रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. येथील सत्यम चौबे यांच्या मालकीच्या श्री मेडिकल दुकानाला अचानक आग लागली. या आगीत फ्रीजसह अन्य साहित्य जळून खाक झाले असून २ लाखांचे नुकसान झाले. दुसऱ्या घटनेत विनोद वाघ यांच्या ‘मालक वडापाव’ सेंटरला आग लागली. दुकानात असलेल्या गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. आगीत दुकानाचे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. सिलिंडरचा स्फोट; अनर्थ टळला वडापाव सेंटरला लागलेल्या आगीदरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ही घटना मध्यरात्री घडल्याने चौकात गर्दी नव्हती, ज्यामुळे हानी टळली. अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.
Source link
सिल्लोड शहरामध्ये 2 दुकानांना आग; 7 लाख रुपयांचे नुकसान:कारण अस्पष्ट, दोन्ही दुकानदारांचे 6 लाखांचे नुकसान