Headlines

Admin

सिंधुदुर्गात 3 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू:दोघेजण थोडक्यात बचावले, वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणातील घटना

राज्यात उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळवण्यासाठी तरुण जलाशय, विहिरी आणि तलावांवर पोहण्यासाठी गर्दी करत असताना, हा आनंद अनेकदा जीवावर बेतत असल्याच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात घडली असून, तिथे तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोघे जण बचावले असल्याची माहिती आहे….

Read More

पुण्यात तरुणीच्या प्रियकराकडून आईच्या प्रियकराचा खून:प्रेमसंबंधांच्या वादातून काळेपडळ पोलिसांनी सहा जणांना अटक केली

पुण्यात प्रेमसंबंधांच्या वादातून एका तरुणीच्या प्रियकराने तिच्या आईच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली आहे. प्रेमसंबंध तोडण्यासाठी मृत व्यक्तीने टाकलेल्या दबावामुळे हा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश संजू…

Read More

कुंभार कारागिरांना आता 9 महिने उचलता येणार माती:700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

कुंभार समाजाला आता व्यवसायासाठी वर्षातील नऊ महिने माती उपसा करण्याची मुभा देण्यात आली असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष क्लस्टर विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. मंत्रालयातील दालनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. महसूलमंत्र्यांनी या समाजाच्या नऊ प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना मंजुरी दिली. या निर्णयांची…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई:नामकर्ण आवारेला अटक, खरातच्या कबुलीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणी सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक महत्त्वाची मानली जात आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत अशोक खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारेची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली…

Read More

PM Modi Petrol Diesel Appeal Impact; MP BJP Pradhuman Tomar

Marathi News National PM Modi Petrol Diesel Appeal Impact; MP BJP Pradhuman Tomar | UP Maharashtra Gujarat Photos नवी दिल्ली/भोपाळ/लखनऊ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ताफा सोडून फक्त 2 गाड्यांसह बाहेर पडले. सामान्यतः पंतप्रधानांच्या ताफ्यात 12 ते 15 गाड्या असतात. आता एका गाडीत पंतप्रधान तर दुसऱ्या गाडीत एसपीजी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित राहतील….

Read More

आधी तुमचे फॅन-कुलर बंद करा, मग कळेल…:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, हॉस्टेलमधल्या मुलींची अडचण तात्काळ सोडवली

शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील वसतिगृहातील मुलींच्या प्रश्नावर मात्र चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील तापमान 45 अंशांवर पोहोचलेले असताना वसतिगृहातील मुलींनी कूलर्सची मागणी केली होती, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे दिली. हा गंभीर प्रकार समजताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूत्रे हलवत प्रशासनाला धारेवर धरले आणि अवघ्या काही…

Read More

एअर इंडियाने 6 आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान उड्डाणे रद्द केली:23 मार्गांवर कपात, जून ते ऑगस्टचे वेळापत्रक जाहीर; इंधन महाग झाल्याने निर्णय

एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरलाइनने बुधवारी सांगितले की, जून ते ऑगस्ट या कालावधीत 6 आंतरराष्ट्रीय मार्ग रद्द केले आहेत. यात दिल्ली-शिकागो आणि मुंबई-न्यूयॉर्क यांसारख्या व्यस्त मार्गांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, 23 आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमानांची संख्या कमी केली आहे. टाटा समूहाच्या एअरलाइन कंपनीने सांगितले की, काही देशांवरून उड्डाणांवर असलेल्या निर्बंधांमुळे आणि…

Read More

राज्यातील महिलांसाठी आता जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’:हार्मोनल व प्रजनन आरोग्य समस्यांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध होणार

राज्यातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभर “पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) क्लिनिक” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या पीसीओडी समस्येवर वेळेत निदान, उपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांनी यासंदर्भात सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य…

Read More

नागपूर विमानतळाचा कायापालट होणार:केंद्र सरकारकडून 'जीएमआर'ला हिरवा कंदील; 30 वर्षांसाठी खासगीकरणाला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भासाठी एक मोठी ‘गुड न्यूज’ दिली आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला विमानतळ विकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून, ‘जीएमआर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड’ (GNIAL) कडे…

Read More

भिडेवाडा स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार:मंत्री अतुल सावे यांची घोषणा, महात्मा फुले जयंतीनिमित्त उपक्रम

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. मंत्री सावे यांनी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त…

Read More