दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक:दोन मोटारसायकलींसह 2 लाख रुपयांचे साहित्य जप्त
मोर्शी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलींसह सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी पहाटे गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. मोर्शी-वरूड रोडवरील वारकरी ढाब्याजवळ दोन मोटारसायकलींवर चार संशयित इसम थांबले असून,…