नेरपिंगळाई संस्थेला 'कृषीरत्न' पुरस्कार प्रदान:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव, कृषी-सहकारात उल्लेखनीय कार्य
नेरपिंगळाई येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेला महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘कृषीरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष संजय सुने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी, सहकार आणि शेतकरी विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेला हा बहुमान मिळाला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांत…