Headlines

Break Shiv Sena Again, Will Break You!



आमच्या पक्षाचे खासदार-आमदार तोडणार असे म्हणणाऱ्या लोकांना वाटते एकदा पक्षाचे दोन तुकडे केले आता पुन्हा करू. त्यांना मी सांगतो आता जर पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणून घेणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

.

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मेहनत घेतात उमेदवार निवडून आणतात आणि तुम्ही त्यांना फोडतात ही कसली लोकशाही आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर देशात जाऊन भाषणं करतात, त्यांनी देशात काय सुरू आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. आज बैठकीला आम्ही खासदारांची वाट बघू नाहीतर कारवाईला सुरूवात करणार. जे खासदार फुटतील त्यांनी सुटी देणार नाही. बेईमानी करणाऱ्या लोकांना आता सोडणार नाही, त्यांच्या मतदारसंघात आम्ही सभा घेणार आहोत यासाठी आमच्यासोबत शरद पवार आणि काँग्रेससुद्धा असणार आहेत. कोणी खासदार फुटला तर त्यांना आम्ही धडा शिकवू.

सर्वांना व्हीप पोहोचला

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते अरविंद सावंत यांनी आज खासदारांची व्हीप काढत बैठक बोलावली आहे. जेव्हा व्हीप काढला जातो त्यावेळी बैठकीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, तो एकप्रकारे पक्षाचा आदेशच असतो, तो पाळावाच लागतो. हा व्हीप सर्व खासदारांपर्यंत पोहोचला आहे. व्हीप त्यांना व्हॉटॲप, फोन, इमेल आणि त्यांच्या घरी सुद्धा पाठवण्यात आला आहे.

परिस्थिती पाहत 15 खासदार येतील असे वाटते

संजय राऊत म्हणाले की, कालपासून बातम्यामध्ये जे वातावरण दिसून येते त्यामुळे मला असे वाटते 9 खासदार असलेल्या आमच्या पक्षाच्या बैठकीला आज 15 खासदार उपस्थित राहतील. आम्ही आताच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही खासदारांना पाठवलेला व्हीप 3 लाईनचा आहे.

..तर कायदेशीर कारवाई करणार

अरविंद सावंत म्हणाले की, व्हीप बजावत बैठकीला बोलवल्यानंतर जे खासदार गैरहजर राहिले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते. मी काही शिवसेना पक्ष प्रमुख नाही मी केवळ कार्यकर्ता आहे, मी व्हीप बजावला कारवाई संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यसभेत शरद यादव सदस्य होते त्यांनी विरोधी पक्षाच्या स्टेजवर जात भाषण दिले त्यावेळी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की आमदार-खासदार फुटला तर त्याला रस्त्यावर तुडवा कारवाईची चिंता करू नका असा आदेश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *