Headlines

जेऊरची 10.5 कोटींची योजना वीज जोडणीअभावी रखडली:जलशुद्धीकरण केंद्र, पाइपलाइन पूर्ण; थकीत वीजबिलामुळे पाणीपुरवठा ठप्प‎



जेऊर (ता. अक्कलकोट) येथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुमारे १०.५ कोटींची योजना राबवूनही गाव तहानलेलेच आहे. हिळ्ळी येथील भीमा नदीतून १९ किलोमीटर पाइपलाइन पूर्ण झाली आहे. शिवाय त्याच योजनेअंतर्गत जल शुद्धीकरण केंद्र व गावा

.

हिळ्ळी येथील जॅकवेल आणि जेऊर येथील जल शुद्धीकरण केंद्रासाठी नवीन वीज कनेक्शन जोडणे आवश्यक आहे. मात्र भीषण टंचाईत वीज मंडळाकडून थकीत बिलासाठी नवीन कोटेशन भरून घेतले जात नाही. याचा नाहक फटका ग्रामस्थांना बसत आहे. जेव्हा दहा कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र ग्रामस्थांच्या पदरी निराशाच पाहायला मिळत आहे. सध्या हिळ्ळी बंधारा पाण्याने भरला असून, वीज मंडळाच्या थकित बिलामुळे ग्रामस्थांची तहान भागत नसल्याचे दिसून येत आहे.

जेऊर गावाला सध्या पाणी टंचाई भेडसावत आहे. पाणी पुरवठ्याच्या चार विहिरी असूनही पाणी मिळत नाही. तारापूरमध्ये शेतात एक विहीर आहे. गद्दे तलावात एक विहीर आणि धुवधुबी प्रकल्पात एक विहीर व दरी तलावात एक असे मिळून चार विहिरी सध्या कार्यान्वित आहेत. सगळे मिळून केवळ अर्धा तास मोटर चालते. त्यामुळे या पाण्यामुळे ग्रामस्थांची तहान भागत नाही. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १० कोटींचे कामे पूर्ण करून केवळ वीज जोडणीअभावी पाणीपुरवठा अंतिम टप्प्यात आहे. धरण उशाला कोरड घशाला अशी स्थिती जेऊर ग्रामस्थांची झाली आहे.

महावितरणने कोटेशन भरून घेतले की कायमस्वरूपी नियमित पाणी देऊ ^जेऊर गावात पाणीटंचाई भासत असल्यामुळे तात्पुरते टँकर मागणी केली आहे. सध्या परिसरातील बोअरवेल, विहिरी आटल्या असून, पर्याय म्हणून टँकर मागणी केली आहे. तसे टँकरचे पाणी पुरत नाही आणि परवडत पण नाही. महावितरण कंपनीने कोटेशन भरून घेतले की हिळ्ळी बंधाऱ्यावरून गावाला कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे. नाइलाजास्तव टँकर मागणी केली आहे. -काशिराया पाटील , उपसरपंच, जेऊर

लवकर कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न चालू या पूर्वी जेऊर ग्रामपंचायत पाणीपुरवठा अंतर्गत महावितरणचे १५ लाख रुपये बिल थकित आहे. मात्र हिळ्ळी जॅकवेलसाठी जे-जे मटेरियल लागणार आहे. उदा- पोल, वायर, डीपीसाठी लागणारे साहित्याचे इस्टिमेट वरिष्ठांकडे सबमिट केले आहे. लवकर कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न चालू आहे. नियमित वीजजोड झाल्यानंतर समस्या सुटेल. – विकास दगडे, शाखा अभियंता, एमएसईबी, करजगी, ता. अक्कलकोट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *