Headlines

टाळ-मृदंगाचा निनाद अन् विठूनामाचा गजर:गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडी सोहळा!

कर्नल परब संचलित सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘विठ्ठल… विठ्ठल…’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला सर्वोच्च स्थान असून विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंचे महत्त्व लहानपणापासूनच रुजावे तसेच गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि…

Read More

श्रीरामपूर-बेलापूर मार्गावर पुन्हा सुरू झाली वृक्षलागवड:‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग, वृक्षप्रेमींमध्ये समाधान, मात्र झाडे जगवण्याचे आव्हान‎

अरुंद रस्ता आणि वाढती वाहतूक यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ हा सहा किलोमीटरचा रस्ता चौपदरी करणे आवश्यक होते. मात्र, या रस्ता रुंदीकरणादरम्यान वडाच्या जुन्या झाडांसह शेकडो झाडे तोडली गेली. त्यानंतर प्रशासनाने झाडे लावली खरी, परंतु पाणीटंचाई व दुर्लक्षामुळे रखरखत्या उन्हात ती सर्व झाडे जळून खाक झाली होती. या गंभीर प्रकाराबाबत ‘दिव्य…

Read More

बुवासिद्ध देव यात्रा:कावड निघाली… राहुरी दुमदुमली! कावड, झेंडा मिरवणुकीसह धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी‎

राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुवासिद्ध देवांच्या वार्षिक यात्रा उत्सवाला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केल्याने संपूर्ण राहुरी शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे बुवासिद्ध देवांच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला….

Read More

अपघात:ट्रक-एसटीची समोरासमोर धडक; एक ठार, ७ जखमी

दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरधाव आयशर ट्रक आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रकमधील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दर्यापूर येथून हिंगणघाटकडे जाणारी एसटी बस लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान पोहोचली असता,…

Read More

एकतर्फी विजयाचा दावा; बंडखोर म्हणतात, निकाल माझ्याच बाजूने:अकोलेत नगरध्यक्षपदासाठी आज मतदान

अकोले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. भाजप नेते तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगरसेविका वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा विजय एकतर्फी होईल, असा दावा केला आहे. मात्र, बंडखोर उमेदवार सोनाली नाईकवाडी यांनी उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार देत आपण निवडणूक लढवून विजयी होणार असल्याचे सांगितल्याने निवडणुकीतील रंगत…

Read More

शहरात श्रीदत्त देवस्थानमध्ये गुरूपौर्णिमेस भाविकांची गर्दी:अमेरिका ते भारतातील गुरूबंधू-भगिनींचा सहभाग‎

प्रेमदान चौकातील वेदांतनगर येथील प.पू. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली. भारतासह अमेरिकेतून आलेल्या गुरूबंधू-भगिनींनी श्रीदत्तक्षेत्रातील सद्गुरू अधिष्ठान मंडपात गुरूचरणी लीन होत गुरुपौर्णिमा सोहळ्याचा आनंद घेतला. उत्सवाच्या पूर्वसंध्येला देवस्थानातील श्री महालक्ष्मी मंडपात कायम विश्वस्त मिलिंद क्षीरसागर यांच्या हस्ते पाठशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन वस्त्रांची भेट देण्यात आली. श्रीदत्तक्षेत्रातील श्रीदत्तात्रेय निवास, भगवान श्रीदत्तात्रेय मंदिर,…

Read More

गुरुमंत्र दीक्षा:गुरुपूजनाने चंद्रेश्वर गडावर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

येथील पुरातन श्रीक्षेत्र चंद्रेश्वर गडावरील श्री चंद्रेश्वर महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. २९) गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. महामुनी भगवान कपिलमुनीजी व श्रीगुरु चंद्रेश्वर बाबांच्या कृपाशीर्वादाने, महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी आलेल्या…

Read More

‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या महिलेचे दीड लाखाचे गंठण पळवले:बजाजनगरमध्ये पान शॉप फोडले; 2. 33 लाखांचा ऐवज लंपास

शहरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात हुडी गँग या नव्या टोळीने दहशत माजवली असून, वाळूज परिसरातील सिडको महानगरात मंगळवारी (२८ जुलै) सकाळी एका ५४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पोलिसांच्या सकाळच्या गस्तीचा (मॉर्निंग पेट्रोलिंग) फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले…

Read More

कौतूक:खात्यावर आलेले 4 लाख केले परत; प्रकाश दहिहंडे यांचा सत्कार

टाकळी बु. येथील प्रकाश जयसिंग दहीहंडे यांच्या बँक खात्यावर नजरचुकीने जमा झालेले चार लाख त्यांनी प्रामाणिकपणे मूळ मालक मोनिका प्रकाश शिरसाट यांना आरटीजीएसद्वारे परत केले. हा प्रकार शाखा व्यवस्थापक येडूबा जाधव, इन्स्पेक्टर विजय शिंदे व क्लर्क मधुकर सुरे यांच्या निदर्शनास आणून पैसे परत करण्यात आले. या प्रामाणिकपणाबद्दल आमदार संजना जाधव यांच्या हस्ते प्रकाश दहीहंडे यांचा…

Read More

चितेगाव-पांगरा रस्त्याची दुरवस्था:विद्यार्थ्यांचे हाल, पालकांकडून संताप व्यक्त

परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे चितेगाव-पांगरा आणि चितेगाव-बोकूडजळगाव या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गांवर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून, शालेय विद्यार्थी, वाहनचालक आणि नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पाण्याखालील खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नाही, ज्यामुळे येथे अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे….

Read More