सावनेरमध्ये भीषण अपघात:रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, रुळावरून जाताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर धावत्या ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी १०:१५ वाजता ही दुर्घटना घडली. निरंजन लक्ष्मण फिरके (वय ४०) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय ३७, दोघे रा. सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे फिरके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सावनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे….