Headlines

पुण्यात राष्ट्रवादीला धक्का!:कात्रज डेअरीच्या कारभाराची होणार उच्चस्तरीय चौकशी; भाजप मंत्र्यांची अ‍ॅक्शन




पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच प्रसिद्ध कात्रज डेअरीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप नेते आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी या चौकशीचे आदेश दिल्याने राजकीय आणि सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी या डेअरीची जबाबदारी घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही मोठी कारवाई झाली आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीला २४ तास व्हायच्या आतच स्ट्राईक
कात्रज डेअरीमध्ये मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. नुकतीच खासदार पार्थ पवार यांनी दूध संघाची एक महत्त्वाची बैठक घेऊन स्वप्निल ढमढेरे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर शुक्रवार, १२ जून रोजी अरुण चांभारे यांची कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र, या निवडीचा आनंद साजरा होऊन २४ तास उलटण्यापूर्वीच डेअरीच्या चौकशीचे आदेश धडकल्याने व्यवस्थापनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वरुण भुजबळ यांच्या तक्रारीनंतर प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील वरुण जयसिंग भुजबळ यांनी २ जून २०२६ रोजी दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्याकडे कात्रज डेअरीच्या कारभाराविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मंत्री सावे यांनी दुग्ध सचिवांना तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. मंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी ११ जून रोजी तातडीने द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीमध्ये: अध्यक्ष: श्रीकांत श्रीखंडे (सहायक दुग्ध निबंधक) सदस्य: अनंत चिंधु आढळारी (जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-२) या समितीला संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 5 मुख्य मुद्द्यांवर होणार चौकशी आरोपांमध्ये तथ्य नाही, पण चौकशीला सहकार्य करणार – संचालक मंडळ
या संपूर्ण वादावर कात्रज दूध डेअरीच्या संचालक मंडळाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. “या चौकशीसाठी प्रशासनाला आमचे पूर्ण सहकार्य राहील आणि आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील. मात्र, विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि डेअरीचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी संचालक मंडळाने नेहमीच प्राधान्य दिले आहे,” अशी भूमिका मंडळाने घेतली आहे. कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ!:गृह विभागाचा मोठा निर्णय; आता सर्व व्हिडिओंची होणार चौकशी स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमांमधील कथित अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्यांवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर बनला आहे. राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणाची दखल घेत मोठा निर्णय घेतला असून, केवळ चर्चेत आलेल्या काही क्लिप्सच नव्हे तर प्रणित मोरेच्या आतापर्यंतच्या सर्व अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *